बीएमडब्ल्यू (BMW) हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाह (Mihir Shah) हा फरार होता. अखेर त्याला महाराष्ट्रातील शाहपूर येथून अटक करण्यात आली. मिहिर शाह याने बीएमडब्ल्यू (BMW) कारने एका दुचाकी वाहनाला धडक दिली त्यात एका महिलेचा मृत्यु झाला होता.
45 वर्षीय कावेरी नाखवा पती प्रदीपसोबत ॲनी बेझंट रोडवरून पहाटे साडेपाचच्या सुमारास जात असताना लक्झरी कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. कावेरीला कारने 100 मीटरपर्यंत खेचले, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. रुग्णालयात पोहोचल्यावर तिचा मृत्यू झाला, तर तिच्या पतीला उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
या घटनेनंतर मिहीर शाह फरार झाला होता. पोलिसांनी त्याचे वडील राजेश शहा आणि चालक राजेंद्रसिंग बिदावत यांच्याविरुद्ध पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दादर महानगर दंडाधिकारी न्यायालयाने चालक राजेंद्रसिंग बिदावतला 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची ही दुसरी कोठडी आहे. राजेश शहा यांना सोमवारी जामीन मिळाला. तसेच आता मुख्य आरोपी मिहिर शाहला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा