Advertisement

मुंबईतील 'या' 7 रेल्वे स्टेशनची नावे बदलणार?

या निर्णयाला पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत मंजुरी देण्यात आली.

मुंबईतील 'या' 7 रेल्वे स्टेशनची नावे बदलणार?
SHARES

मुंबईतील 9 रेल्वे स्टेशनची नावे बदलण्याचा ठराव विधानपरिषदेत मंजूर झाला आहे. विधिमंडळाच्या मान्यतेने आता हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे. मध्य रेल्वेवरील 2, पश्चिम रेल्वेवरील 2 आणि हार्बर रेल्वेवरील 4 स्थानकाचा यात समावेश आहे. 

मध्य रेल्वेवरील करीरोड रेल्वे स्थानकाचं नाव बदलून लालबाग तर सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव मुंबादेवी आणि चर्नीरोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगाव रेल्वे स्थानक करण्यात येणार आहे. 

हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव काळाचौकी, सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी, डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाचं नाव माझगाव आणि किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक करण्याची शिफारस या ठरावात करण्यात आली आहे.

'या' स्टेशनचे नाव बदलण्यात येणार 

  • करी रोड – लालबाग
  • सँडहर्स्ट – डोंगरी
  • मरीन लाईन – मुंबादेवी
  • चर्नी रोड – गिरगांव
  • कॉटन ग्रीन- कालाचौकी
  • डॅाकयार्ड – माझगांव 
  • किंग सर्कल- तिर्थंकर पार्श्वनाथ



हेही वाचा

मध्य रेल्वेच्या आषाढी यात्रेसाठी 64 विशेष गाड्या

ठाणे रेल्वे स्थानकातील 170 पैकी 136 सीसीटीव्ही कॅमेरे निकामी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा