कॉलेज प्रवेशासाठी अकरावीच्या मार्कशीटमध्ये छेडछाड, विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल

विलेपार्ले येथील महाविद्यालयातील ही घटना आहे.

कॉलेज प्रवेशासाठी अकरावीच्या मार्कशीटमध्ये छेडछाड, विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल
SHARES

कॉलेजमध्ये दाखला घेण्यासाठी अकरावीच्या मार्कशीटमध्ये छेडछाड करणाऱ्या १७ वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला समन्स पाठवला आहे. विलेपार्ले येथील महाविद्यालयातील ही घटना आहे.  

7 जुलै रोजी महाविद्यालयाने फसवणूक, खोटेपणा आणि तोतयागिरी केल्याप्रकरणी विद्यार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर जुहू पोलिसांनी अलीकडेच त्याला समन्स बजावले.

जुहू पोलिसांनी सांगितले की, इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्याने 11 वीच्या मार्कशीटमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एडिटिंग सॉफ्टवेअरचा वापर करून छेडछाड केली होती. महाविद्यालयाचे अधिकारी प्रमाणपत्रे तपासत असताना हे उघडकीस आले आणि मूळ मार्कशीटमध्ये तफावत आढळून आली ज्याची फोटोकॉपीशी तुलना केली गेली.

कॉलेजचे अधिकारी राजेश गरीबे (५५) यांनी तक्रारीत म्हटले आहे की, "महाविद्यालयीन विद्यार्थ्याने 22 जून रोजी त्याच्या शैक्षणिक तपशीलांची पडताळणी मागितली होती. त्यानुसार विजय धुरी, त्याच्या प्रमाणपत्राची पडताळणी करत असताना त्यांना संशय आला आणि त्याने त्याची तपासणी केली. त्यात आढळले की, त्याने छायाप्रतीमधील गुण संपादित केले होते जे मूळ मार्कशीटमधल्या गुणांशी जुळत नव्हते."

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अंतर्गत चौकशी दरम्यान विद्यार्थ्याने गुणांमध्ये छेडछाड केल्याचे महाविद्यालयाला आढळून आले. महाविद्यालयाने विद्यार्थ्याच्या पालकांना फोन करून सर्व माहिती दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.



हेही वाचा

बेपत्ता एमबीबीएस विद्यार्थी: न्यायालयाकडून लाईफगार्डची नार्को चाचणी करण्यास परवानगी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा