तुम्हच्या घरात भेसळयुक्त दूध तर येत नाहीना, भेसळयुक्त दूधाची विक्री करणाऱ्यांचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला

पोलिसांनी सुमारे अडीचशे लिटर भेसळयुक्त दूध आणि इतर साहित्य हस्तगत केले

तुम्हच्या घरात भेसळयुक्त दूध तर येत नाहीना, भेसळयुक्त दूधाची विक्री करणाऱ्यांचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला
SHARES

देशात कोरोनाशी दोन हात करण्यास संपूर्ण प्रशासन व्यस्त असताना. दुसरीकडे परिस्थितीचा फायदा घेत, नागरिकांना भेसळयुक्त दूध देणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा 9 च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून पोलिसांनी सुमारे अडीचशे लिटर भेसळयुक्त दूध आणि इतर साहित्य हस्तगत केले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

 हेही वाचाः- अभिनेत्रीचे खासगी फोटो शेअर केल्याने कास्टिंग डिरेक्टरला अटक

 

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असताना. या रोगाच्या पार्श्वभूमिवर काही जणांनी काळाबाजार सुरू केला आहे. मुलुंडमध्ये कोरोना बरा करण्याच्या नावाखाली अन्न पचनाच्या गोळ्या देण्यता येत होत्या, तर काही ठिकाणी मास्क जादा किंमतीला विकले जात होते. त्यानुसार जोगेश्वरीत दूधात की काही जण काळाबाजार करत असल्याची माहिती गुन्हे शाखा ९ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाली होती. देसाईच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 9 चे उपनिरीक्षक विजेयन्द्र आंबवडे सहायक निरीक्षक सुधीर जाधव, आंबवडे, काकडे, देवरुखकर, नाईक, हाके, गवते यांच्या पथकाने जोगेश्वरी पश्चमिकेडील नवशक्तीनगर, आदर्शनगर या परिसरात छापेमारी केली. त्यावेळी त्यांना अमूल, गोकुळ, मदर डेअरी यांसारख्या नामांकित कंपनीच्या दुधामध्ये दूषित पाणी मिसळून त्याची विक्री केली जात असल्याचे आढळून आले.


पहाटे हे दूध येत असल्याने अंधारात दोन व्यक्ती ब्लेडने दुधाच्या पिशव्या फोडून त्यामध्ये दूषित पाणी भरून पुन्हा मेणबत्तीच्या साहाय्याने चिकटवीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सुमारे अडीचशे लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून त्याच ठिकाणी नष्ट केले. श्रीनिवास मल्लेश नालमादी (41), जानया लिगय्या बट्टू (42) अशी या दोघांची नावे आहेत. या पूर्वी ही देसाई यांनी पश्चिम उपनगरात भेसळयुक्त दूधाची विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखा 9 चे पोलिस अधिक तपास करत आहेत. 

 हेही वाचाः- Coronavirus Updates: रेल्वे प्रवाशांचं स्क्रीनिंग करण्यासाठी राज्य सरकारची रेल्वेला विनंती

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा