टी.पी.राजाची हत्येतील आरोपींच्या घरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त


टी.पी.राजाची हत्येतील आरोपींच्या घरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
SHARES

कुख्यात गुंड डि.के.रावचा हस्तक टि.पी.राजाच्या हत्येतली मुख्य आरोपी इम्रानला काही दिवसांपूर्वीच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. इम्रानच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता. पोलिसांना २ देशी कट्टे, १ पिस्तुल आणि २० राऊड आणि इतर असा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. सध्या हे दोघेही १४ जानेवारीपर्यंत पोलिसांच्या कोठडीत आहेत.


वादातून हत्या

सायनच्या म्हाडा काॅलनीत रहात असलेला टीपी राजा हा छोटा राजन आणि डी.के.रावसाठी काम करायचा. ७ डिसेंबर रोजी प्राॅपर्टीच्या वादातून सराईत गुंड अमझत मकबूल खान आणि इम्रान कुरेशी यांनी घरात घुसून त्यांची हत्या केली. टी.पी.राजा आणि इतर आरोपी हे फार जुने मित्र होते. या तिघांनी या पूर्वी धारावीतील एका विकासकाला तेथील रहिवाशांना हटवून प्लाॅट मोकळा करून घेतला होता. तर मिरारोड येथील जागेचाही व्यवहार सुरू होता. मात्र या व्यवहारातून राजा अमझत आणि कुरेशीत वाद सुरू होते. या वादातूनच या दोघांनी ही हत्या केल्याची कबूली दोघांनी पोलिसांना दिली. या हत्येनंतर काही तासातच अमजत पोलिसांच्या हाती लागला. मात्र इम्रान पोलिसांना चकवा देण्यास यशस्वी ठरला.


हत्येची कबुली

अखेर ३१ डिसेंबरच्या रात्री इम्रान कळंबोली येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. इम्रानच्या घराची झडती घेतली असता. त्याच्या घरातून पोलिसांनी २ देशी कट्टे, १ पिस्तुल आणि २० राऊड, चाकू आणि इतर घातक शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या देशी कट्टे आणि पिस्तुलीचे त्याच्याजवळ लायसन्स नसल्याचे ही निदर्शनास आले आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या देशी कट्ट्यानेच टीपीराजावर गोळ्या झाडल्याची कबूली इम्रानने पोलिसांना दिली. मात्र तीन गोळ्या झाडून ही टी.पी.राजा मृत न झाल्याने त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याची निर्घून हत्या केल्याची कबूली इम्रानने पोलिसांना दिली आहे. इम्रान सध्या गुन्हे शाखा पोलिसांच्या कस्टडीत आहे.


घरफोडीतलाही आरोपी

या आधी टी.पी.राजा, कुरेशी आणि नरेंद्र सिंग यांनी २००६ साली कृष्णा केबलवाल्याची शिवडी कोर्टाबाहेर हत्या केली होती. या हत्येत दोघांना मकोका अंतर्गत कारवाई केली होती. इम्रान हा सराईत घडफोडीतला आरोपी आहे. या हत्येच्या गुन्ह्यात दोघेही सात वर्ष आत होते. २०१५ मध्ये हे दोघे ही जामीनावर बाहेर आले होते. त्यानंतर त्यांनी विकासकाशी हात मिळवणीकरून प्लाँट रिकामी करण्याची काम घेतली होती. राजावर सराईत १७ गुन्हायांची नोंद आहे. तर इम्रान कुरेशीवर १२ गुन्ह्यांची नोंद आहे. तर अमझतवर ३ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील इम्रानचा शोध पोलिस घेत आहेत.
संबंधित विषय