54 लाखांच्या अंमली पदार्थासह दोघांना अटक

 Kandivali
54 लाखांच्या अंमली पदार्थासह दोघांना अटक

मुंबई गुन्हे शाखेने कांदिवलीवरून 54 लाखांच्या अंमली पदार्थासह दोघांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. योगेश शहा (30) आणि दीपक गुप्ता (28) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून, या दोघांकडून गुन्हे शाखा कक्ष 3 ने इफेड्रीन, ब्रोम्हेझाईन, मेथामफेटामाईन आणि केटामाईन नावाचे तब्बल 2 किलो 669 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

सोमवारी कांदिवली येथील दामू नगरच्या गावडे कंपाउंड रहिवाशी वेल्फेअर सोसायटी मध्ये दोन इसम अंमली पदार्थाचा मोठा साठा घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 3 ला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेने सापळा लावला आणि योगेश शहा (30) आणि दीपक गुप्ता या दोघांना रंगेहाथ अटक केली. या दोघांना मंगळवारी कोर्टात हजार केले असता कोर्टाने दोघांना 12 तारखेपर्यंत गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे. हे ड्रग्स कोणाला देण्यासाठी आणण्यात आले होते याचा सध्या गुन्हे शाखा तपास करत आहे.

Loading Comments