मुंबई पोलिसही करणार क्रूझ पार्टी प्रकरणाचा तपास

एनसीबीनं अलीकडेच मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याबद्दल अनेकांना अटक केली आहे.

मुंबई पोलिसही करणार क्रूझ पार्टी प्रकरणाचा तपास
SHARES

एनसीबीनं अलीकडेच मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याबद्दल अनेकांना अटक केली आहे. आता मुंबई पोलिस याप्रकरणी सक्रियं झाली आहे. क्रूझच्या कार्यक्रमाविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तसंच पार्टीशी संबंधित परवानगी घेण्यात आली नसल्याचेही पोलिसांचं म्हणणं आहे.

कोरोना संसर्गासंदर्भात महाराष्ट्रात महामारी कायद्याअंतर्गत अनेक निर्बंध आहेत. यानुसार, 5 पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यासही मनाई आहे. मुंबई पोलिस कायद्याचे उल्लंघन झालं की नाही याचीही चौकशी करत आहेत. आणि जर असं घडलं असेल तर मुंबई पोलीस त्याची चौकशी करण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात जर नियम मोडल्याची बाब समोर आली तर मुंबई पोलीस त्यामध्ये कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदवू शकतात. मुंबई पोलिसांनी क्रूझ प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी मुंबई पोलीस क्रूझ टर्मिनलचे सीसीटीव्ही फुटेज तपासतील. सूत्रांचं म्हणणं आहे की, ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्या घटनेशी संबंधित माहिती आली (Instagram) त्याचीही चौकशी केली जाईल.

शनिवारी रात्री क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्यामुळे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह ८ जणांना NCBनं ताब्यात घेतलं होतं. नंतर त्यांना अटक करण्यात आली. सध्या, आर्यनसह सर्व ८ जणांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत पाठवण्यात आलं आहे.हेही वाचा

IRCTC क्रूझ पर्यटनाबाबत सतर्क, NCB नं छापा टाकलेल्या क्रुझशी झाला होता करार

आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा