आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी

आर्यन खानसह अन्य ३ आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली गेली आहे.

आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी
SHARES

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह ८ जणांवर केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकानं (एनसीबी) कारवाई केली. याप्रकरणी आर्यन खानसह अन्य ३ आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली गेली आहे. केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकानं प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी आर्यनसह ८ जणांना रविवारी अटक केली. त्यानंतर आर्यन खानला एक दिवसाची एनसीबी कोठडी देखील सुनावण्यात आली होती.

याप्रकरणी आर्यनसह इतर आरोपींना सोमवारी मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यामुळं आर्यनला जेल होणार की बेल मिळणार? याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर याबाबत न्यायालयानं निर्णय दिला आहे. त्यानुसार, अखेर आर्यन खानसह अन्य ३ आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.

आर्यन खानकडून वकील सतीश मानशिंदे यांनी बाजू मांडली. तर दुसरीकडे, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह हे एनसीबीकडून बाजू मांडली. तर, आर्यन खानच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व धक्कादायक फोटो स्वरूपातील माहिती आढळल्याचं समोर आल्यानं, त्याच्या कोठडीत ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली जावी. अशी मागणी यावेळी एनसीबीकडून करण्यात आली होती.

आर्यनच्या फोन चॅटमध्ये बऱ्याच गंभीर स्वरूपातील लिंक आढळून आल्या आहेत, ज्यांचा संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी देखील लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा