Advertisement

IRCTC क्रूझ पर्यटनाबाबत सतर्क, NCB नं छापा टाकलेल्या क्रुझशी झाला होता करार

IRCTC नं Cordelia नावाच्या विदेशी क्रूझ लाइनरशी करार केला होता.

IRCTC क्रूझ पर्यटनाबाबत सतर्क, NCB नं छापा टाकलेल्या क्रुझशी झाला होता करार
SHARES

क्रूझ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन रेल्वे टुरिझम अँड केटरिंग कॉर्पोरेशन (IRCTC)नं यावर्षी सप्टेंबरपासून प्रथमच तिकीट बुकिंग सुरू केलं. यासाठी IRCTC नं Cordelia नावाच्या विदेशी क्रूझ लाइनरशी करार केला होता. आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) या क्रूझ लाइनरवर छापा टाकल्यानंतर आयआरसीटीसी सतर्क झाली आहे.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या या क्रूझमध्ये काही लोकांनी ड्रग्स पार्टी केल्याचा आरोप केल्यानंतर आयआरसीटीसीनं करारावर पुनर्विचार केला आहे.

आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं आहे की, अशा प्रकरणांमध्ये अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. त्यामुळे क्रूझ कंपनी आणि बुकिंग कंपनी (IRCTC) दोन्ही भविष्यात अधिक सावध राहतील.

दरम्यान, आयआरसीटीसीच्या मार्केटिंग एजंट्सनाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आयआरसीटीसीची कोणतीही भूमिका नसल्याचं अधिकारी म्हणाले. त्यांच्या तर्फे फक्त तिकीट बुकिंग केलं जातं आणि या आधारावर कमिशन शेअर केलं जातं.

IRCTC च्या मते, सुमारे २० प्रवाशांनी डिसेंबरसाठी केरळ याठिकाणी जाण्यासाठी बुकिंग केलं आहे. आयआरसीटीसीनं स्पष्ट केलं आहे की, बुकिंग त्यांच्या वेबसाइटद्वारे केलं जाऊ शकतं. परंतु या परिस्थितीत जबाबदारी प्रवाशांची आहे.

या क्रूझसाठी IRCTC नं केलेलं बुकिंग, त्याची पहिली ट्रिप १८ सप्टेंबर रोजी मुंबईहून निघाली. परदेशी कंपनीशी करार झाल्यापासून IRCTC कडून तिकीट बुकिंगबाबत प्रवाशांकडून चौकशी केली जात होती.

या क्रूझ लाइनरमध्ये २००० प्रवासी प्रवास करू शकतात. हे गोवा, लक्षद्वीप आणि कोचीसाठी बुक केलं जात आहे. कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन २०२२ मध्ये परदेश दौरा सुरू केला जाईल. क्रूझमध्ये रेस्टॉरंट, बार, ओपन सिनेमा, चिल्ड्रेन प्ले एरिया आणि जिम यासारख्या सुविधा आहेत.



हेही वाचा

मुंबई विमानतळाचे टर्मिनल १ खुले करण्यास मान्यता

२०२८पर्यंत 'बेस्ट'च्या सर्व बस धावणार विद्युत ऊर्जेवर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा