सोशल मिडियावर माहिती शोधताना घ्या काळजी, ११ हजार जणांची फसवणूक


सोशल मिडियावर माहिती शोधताना घ्या काळजी, ११ हजार जणांची फसवणूक
SHARES

नेटफ्लिक्सवर काही दिवसांपूर्वी ‘जिल्हा जमतारा’ या नावाने एक व्हेब सिरिज प्रदर्शित करण्यात आली होती. या सिरिजमध्ये नागरिकांना फोनकरून किंवा त्यांची माहिती चोरून फसवले जायचे. तशाच प्रकारे हजारो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा मुंबईच्या सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फसवणूकीसाठी या टोळी नामकिंत कंपन्यांची हुबेहुब तब्बल १२५ बनावट संकेतस्थळ बनवल्याचे निदर्शनास आले आहे. या टोळीने आतापर्यंत  १० हजार ५३१ जणांची १० कोटी रुपयांना फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.  या टोळीच्या सहा सदस्यांना नुकतीच सायबर पोलिसांनी अटक केली होती.

हेही वाचाः- बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियममध्ये ५० टक्के सवलत

 तक्रारदार गोरेगाव येथील रहिवासी असून ते एका खासगी कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतात. समाज माध्यमांवर त्यांनी एक जाहिरात पाहिली होती. त्यात गॅस एजन्सी मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याशिवाय त्यासाठी मिळणारी ३० लाखांची सबसिडीही मिळवून देणार असल्याचे नमुद करण्यात आले होते. त्यांनी संबंधीत लिंकवर क्लीक केले व तेथील फॉर्म पत्नीच्या नावे भरला. दोन दिवसानंतर त्यांना डीके शर्मा नावाच्या व्यक्तीचा दूरध्वनी आला. त्याने आपण एलपीजी वितरक येथून बोलत असल्याचे सांगितले. त्याने तक्रारदाराला एजन्सी देण्यासाठी निवडले असल्याचे सांगितले. एजन्सी व ३० लाख रुपयांचे सरकारी अनुदान देण्यासाठी आरोपी विविध फी भरायच्या असल्याचे सांगितले. त्यात ना हरकत प्रमाणपत्र, प्रोसेसिंग फी यासाठी तीन लाख ६६ हजार रुपये तक्रारदाराने भरले. त्यानंतर तक्रारदाराला कन्फर्मेशन लेटर मिळाले. त्याची पडताळणी करण्यासाठी संकेतस्थळावर देण्यात आलेल्या पत्त्यावर त्याने जाऊन पाहणी केली असता तो बोगस असल्याचे निष्पन्न झाले. पुढे संकेतस्थळही बनावट असल्याचे निष्पन्न झाले. अखेर त्याने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पटना येथून रवीकुमार रविदास(३६) व डॉली शर्मा(३५)सह सहा जणांना अटक केली आहे.

हेही वाचाः- महिला उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्यात ‘महिला उद्योजकता कक्ष’

गेल्या दोन वर्षांपासून या टोळक्याचा म्होरक्या सायबर फसवणूक करत आहे. त्यातून तो नुकतीच पश्चिम बंगालमध्ये पाच कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी करणार होता. पण त्यापूर्वीच त्याला अटक झाली. त्याने आतापर्यंत १० कोटी रुपये या मार्गाने कमवल्याचा अंदाज आहे. त्याने आतापर्यंत १२५ संकेतस्थळाच्या सहाय्ायने १० हजार ५३१ नागरीकांची फसवणूक केल्याचे बँक व्यवहारातून निष्पन्न झाले आहे. तरी याप्रकरणी अद्याप १२१ बनावट संकेतस्थळांची पडताळणी बाकी असल्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा