मुंबईत ५ कोटींचे ड्रग्ज हस्तगत

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं एका नायजेरियन नागरिकाला अटक केली असून त्याच्याकडून ५ कोटी रुपयांचे एमडी आणि कोकेन ही ड्रग्ज हस्तगत केली आहेत.

मुंबईत ५ कोटींचे ड्रग्ज हस्तगत
SHARES

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं एका नायजेरियन नागरिकाला अटक केली असून त्याच्याकडून ५ कोटी रुपयांचे एमडी आणि कोकेन ही ड्रग्ज हस्तगत केली आहेत. या नायजेरियन तरुणाने दिल्ली येथून ही ड्रग्ज आणली होती. एक नायजेरियन नागरिक मुंबईत ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ४च्या पथकाला मिळाली.

प्रभारी पोलिस निरीक्षक इंद्रजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकानं रविवारी आणिक बस डेपोसमोर सापळा लावला. तेथे एक संशयित त्यांना फिरत असल्याचे दिसले. या तरुणाकडील पर्सची तपासणी केली असता पर्समधील अस्तराच्या आत एमडी ड्रग्ज आणि कोकेन लपविण्यात आले होते. या ड्रग्जची किंमत ५ कोटींपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अमली पदार्थविरोधी पथकासह गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांकडून अमली पदार्थाची तस्करी, विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर बारीक नजर ठेवली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक इंद्रजीत मोरे आणि बिराजदार यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून नवी मुंबईतील खारघर येथून अँथोनी याला ताब्यात घेतले.

त्यांनी झडती घेतली असता, पोलिसांना तिथे काहीच आढळून आले नाही. त्यानंतर त्यांनी त्याच्या हातात असलेली पर्स बघितली. पर्सच्या आतमध्ये अस्तरा लावण्यात आला होता. त्यात एमडी आणि ११८ ग्रॅम कोकेन आणि दहा हजारांची रोकड सापडली असल्याची माहिती मिळते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा