परदेशातून दिरानं दिली वहिनीच्या हत्येची सुपारी, ५ जणांना अटक


परदेशातून दिरानं दिली वहिनीच्या हत्येची सुपारी, ५ जणांना अटक
SHARES

मुंबईच्या गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी एका हायप्रोफाईल गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. मटका किंग सुरेश भगतच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भाऊ विनोदनं वहिनी जया भगत आणि तिच्या बहिणीच्या हत्येची सुपारी दिली होती. तब्बल ६० लाख रुपये शूटरला दिले होते. मात्र या सुपारीची कुणकुण गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळताच पोलिसांनी ५ जणांना या प्रकरणी अटक केली आहे. मकसुद कुरेशी (३५), मोहम्मद जावेद अन्सारी (४१), मोहम्मद अन्वर दर्जी (३१), विनोद भगत (६९), रामविर वर्मा (३९) अशी या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचाः- पंचतारांकित हॉटेलमधील पबवर पोलिसांची कारवाई, बड्या सेलिब्रिटींवर कारवाई

मटका किंग सुरेश भगत याच्या हत्येच्या गुन्ह्यात त्याची पत्नी जया भगत आणि तिची बहिण यांच्यावर आरोप आहेत. या गुन्ह्यात सध्या दोघीही जामीनावर मुक्त आहे. सुरेश भगतचा भाऊ विनोद याला आपल्या भावाच्या हत्येचा बदला घ्यायचा होता. त्यातूनच त्यानं वहिनी जया भगत आणि तिच्या बहिणीच्या हत्येची सुपारी दिली होती. विनोद भगतनं लंडन येथील मामूला दोघांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानुसार मामूनं उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील शूटरला ती  सुपारी फिरवली होती. बिजनौरच्या आरोपींनी अहमदाबाद आणि मुंबई येथील आरोपींच्या मदतीनं जया भगत आणि तिच्या बहिणीची रेकी केली होती. पण हत्या करण्याआधीच मुंबई क्राईम ब्रँचनं २ आरोपींना अटक केली. आरोपीकडून देशी कट्टे आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. नंतर पोलिसांनी बिजनौर येथून एक तर गुजरातमधील पालनपूर येथून एक अशा पाच आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी लंडन येथील असून तो फरार आहे. याप्रकरणी आणखी काही धागेदोरे हाती लागतात काय, याचाही शोध पोलिस घेत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा