मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ३ जणांना अटक


मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ३ जणांना अटक
SHARES

मुंबईच्या जुहू परिसरात सुरू असलेल्या एका हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा  मुंबईच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत ८ मुलींची सुटका केली असून ३ आरोपींना अटक केली आहे. संदीप दशरत इंगळे (३८), तान्या योगेंद्र शर्मा (३१), हनुफा मुजाहिद सरदार उर्फ तानिया (२६) अशी या आरोपींची नावे आहेत. मुंबईतील आलिशान हॉटेलमधील हा प्रकार सुरू होता.

हेही वाचाः- IPL 2021: मुंबई इंडियन्सचा मलिंगासह 'या' खेळाडूंना सोडचिठ्ठी

पोलिसांच्या गुन्हे शाखेने जुहू येथील एका हॉटेलवर धाड टाकली. त्यावेळी तेथे सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आल्यानंतर आठ तरुणींची तेथून सुटका केली गेली आहे. या तरुणींना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलले जात असल्याचे ही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून देहविक्रीसाठी सु्द्धा तरुणांना भाग पाडल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. याआधी कल्याण  पूर्वेतील नांदीवली परीसरात एका इमारतीत चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली होती. या कारवाईत एका तरुणासह ४बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली होती.  नांदीवलीतील एका इमारतीत देहविक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या इमारतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा