मुंबई लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद


मुंबई लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद
SHARES
कोरोना या संसर्ग रोगाच्या पार्श्वभूमिवर देशाची आर्थिक राजधानी मुंबईची रक्तवाहिनी समजली जाणारी मुंबई लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली असून, राज्यातील जनतेने आता कोरोना विषाणू प्रादुर्भाव गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. सरकारने रेल्वे बंद न करता, लोकलच्या दैनदिन फेऱ्या ही 35 टक्क्यांनी कमी केल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लोकलमध्ये अनावश्यक गर्दी करू नका असे मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व शाळा, महाविद्यालय आणि खासगी कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असताना. अनेक कंपन्यांनी आपली कार्यालये शटरबंद करून सुरूच ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नोकरीच्या भितीने लोकलमध्ये नागरिकांची गर्दी काही कमी होत नसल्याने विभागीय आयुक्त कोकण विभागाकडून आता रेल्वेतून अनावश्यक प्रवास करणाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


त्यामुळे रविवारी सकाळी ६ वाजवल्या पासून ही मुंबई लोकल सेवा सर्व सामान्य नागरिकांसाठी बंद होईल. दि. ३१ मार्च पर्यंत ती बंद राहील. या दरम्यान अत्यावश्यक सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मात्र आपले ओळखपत्र दाखवून प्रवास करता येणार आहे. अनावश्यक प्रवास करणाऱ्यांना रोखण्यासाठी एक पथक नेमले जाणार असून त्यात रेल्वे पोलिस, स्टेट पोलिस, वैद्यकिय अधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्याचा समावेश असणार आहे.अत्यावश सेवा पुरवणारे, कामगार आणि रुग्णांना रेल्वेतून प्रवास करता येईल, पाच जिल्ह्यातील 135 रेल्वे स्थानकावर हे पथक कार्यरत राहणार आहे. लोकलच्या दैनदिन फेऱ्या ही 35 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. अनावश्यक प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार, तर होम कारनटाइंन रुग्ण रेल्वेत आढळल्यास त्याला 14 दिवस रुग्णालयात पून्हा होम क्वारनटाइंन कक्षात ठेवले जाणार असल्याची माहिती कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तानी दिली आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा