अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावानं महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल

आरोपीने पीडितेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव घेऊन आणि पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावानं महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल
(Representational Image)
SHARES

मुंबई पोलिसांनी गुरुवारी एका 75 वर्षीय व्यावसायिकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 35 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला लेखिका आहे. जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका व्यावसायिकाने तिच्यावर बलात्कार केल्याचे तिचे म्हणणे आहे.

पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, बलात्कारानंतर आरोपीने तिला गप्प राहण्याची धमकी दिली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी आपले संबंध असून बलात्काराबाबत कोणाला सांगितले तर ठार मारले जाईल, अशी धमकी आरोपीने दिली होती.

पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, तिला डी कंपनीतील कोणीतरी फोन करुन व्यावसायिकाविरुद्ध तक्रार करू नये असे सांगितले. तसेच आरोपीने आपल्याकडून दोन कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते परत केले नाही. आवाज उठवल्यावर तिच्यावर अत्याचार केला. तसेच याबद्दल कुठेही वाच्यता केली तर ठार मारण्याची धमकी दिली.

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि तो आता एमआयसीडी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. डी कनेक्शन दृष्टीकोनातून पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.हेही वाचा

३ दिवसांपासून अनेक भारतीय साइट्सवर सायबर हल्ले, माफी मागा नाहीतर....

ठाणे पोलिसांची वेबसाईट इस्लामिक हॅकर्सकडून Hacked

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा