ठाणे पोलिसांची वेबसाईट इस्लामिक हॅकर्सकडून Hacked

नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचं वक्तव्य, मंदिर-मशिद वादाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं आहे.

ठाणे पोलिसांची वेबसाईट इस्लामिक हॅकर्सकडून Hacked
(Representational Image)
SHARES

भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता ठाणे पोलिसांची अधिकृत वेबसाईट हॅक करण्यात आली आहे.

मलेशियातील हॅक्टिविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशभरातील अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. या ग्रुपनं जगभरातल्या मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर अटॅक (Cyber Attack) करण्याचं आवाहन केलं.

नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचं वक्तव्य, मंदिर-मशिद वादाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं आहे. मुस्लिम धर्मियांची माफी मागा हाच संदेश हॅकर्सनी वेबसाईट हॅक केल्यानंतर दिला आहे.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "या ग्रुपनं 'opspatuk' किंवा प्रतिहल्ला (StrikeBack) हे ऑपरेशन सुरू केलं असून, त्याचा अर्थ स्ट्राईक बॅक असा होतो. त्यामुळेच भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक (Website Hack) झाल्या आहेत. मुस्लिम धर्मियांची माफी मागा हाच एक संदेश सर्व वेबसाईटवर देण्यात येत आहे. यातून सरकारकडे असलेली अतिशय गुप्त आणि महत्त्वाची माहिती चोरली जाण्याची देखील शक्यता आहे."

गेल्या काही दिवसांपासून देशात मंदिर-मशीद मुद्दा चांगलाच तापला आहे. तसेच मोहम्मद पैगंबर (Prophet Muhammad) यांच्यावरील टिप्पणी प्रकरणामुळं देशात अनेक ठिकाणी हिंसाचार भडकला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांच्यासह मुस्लिम समाजातील दिग्गजांनी देशात मुस्लिम असुरक्षित असल्याची वक्तव्य केली आहेत.

दरम्यान, राज्य सरकारच्या गृह विभागानं दिलेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवर झालेल्या सायबर हल्ल्याप्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. सध्या ठाणे पोलिसांची वेबसाईट रिस्टोअर करण्याचं काम सुरु आहे.



हेही वाचा

वांद्रे वरळी सी लिंकवर पक्ष्याला वाचवण्यासाठी थांबले, अपघातात जीव गमावला

मुंबई हाय अलर्टवर! सुरक्षेत वाढ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा