वांद्रे वरळी सी लिंकवर पक्ष्याला वाचवण्यासाठी थांबले, अपघातात जीव गमावला

अपघातात एका व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता.

वांद्रे वरळी सी लिंकवर पक्ष्याला वाचवण्यासाठी थांबले, अपघातात जीव गमावला
SHARES

मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर (Bandra Worli Sea link Accident) भीषण अपघात (Road Accident News) झाला होता. आठवड्याभरापूर्वी झालेल्या या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज (Accident CCTV Video) समोर आलंय. या अपघातात एका व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता.

एका जखमी पक्ष्याला वाचव्यासाठी व्यावसायिक आणि त्याचा ड्रायव्हर सी लिंकवर थांबले होते. यावेळी भरधाव वेगानं येत असलेल्या एका टॅक्सीनं दोघांना चिरडलं. यात दोघेही जण गंभीररीत्या जखमी झाले होते. दरम्यान, व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

अमर जरीवाला असं वरळी सी लिंक अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे. या अपघातप्रकरणी टॅक्सी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. भरधाव वेगानं आणि बेजबाबदारपणे वाहन चालवल्याप्रकरणी टॅक्सी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अवघ्या 16 सेकंदाचा अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये पश्चिम उपगराच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर अमर जरीवाला यांची कार उभी होती.

डाव्या लेनमध्ये ही कार थांबलेली असल्याचं दिसतंय. गाडीच्या मागच्या बाजूला दोघेजण उभे आहेत. यात जरीवाला आणि त्यांच्या कारचा ड्रायव्हर असे थांबलेले आहेत. समोर गाडी थांबलेली आहे, हे पाहून सफेद रंगाची एक कार वेग कमी करते आणि उजव्या बाजूने ओव्हरटेक करुन जातना दिसते.

पुढे जरीवाला आणि ड्रायव्हर हे उजव्या बाजूच्या लेनमध्ये हळू हळू सरकताना दिसतात. नेमक्या याच क्षणी भरधाव वेगाने एक टॅक्सी त्यांच्या दिशेने येत आहे. ट्रॅक्सी चालकाला वेग नियंत्रित करता येत नाही.

टॅक्सी दोघांना भरधाव वेगातच ठोकर देते. दोघांना हवेत उडवते. जोरदार धडक दिल्यानंतर हवेत उडालेले दोघंही जण जोरदार जमिनीवर आदळतात आणि त्यांनी गंभीर जखम होते. काळजाचा ठोका चुकवणारा या अपघात अंगावर काटा आणणार असतो.



हेही वाचा

पॉक्सो, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी डीसीपींची परवानगी लागणार

मुंबई हाय अलर्टवर! सुरक्षेत वाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा