मृत्यूचा 'मेट्रो'मार्ग

साकीनाका - 18 सप्टेंबरला एका तरुणाने मेट्रोखाली येऊन आत्महत्या केली होती. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, हा हादरवून टाकणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये हा तरुण मेट्रो जवळ यायची वाट बघत होता. जशी मेट्रो जवळ आली तशी त्याने ट्रॅकवर उडी मारली आणि तो ट्रॅकवर आडवा झोपला. मेट्रोच्या चालकाने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत तो मेट्रोच्या चाकाखाली आला होता.

उदयकुमार असे या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरूण मूळचा बिहारचा होता. त्याच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या का केली याचे गूढ अजूनही कायम आहे.

Loading Comments