गोरेगाव : रिक्षातच महिलेवर अतिप्रसंग, आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

गोरेगाव : रिक्षातच महिलेवर अतिप्रसंग, आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक
SHARES

मुंबईतील (Mumbai News) गोरेगाव (Goregaon) आरे कॉलनी (Aarey Colony) परिसरात 20 वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे. रिक्षातच या तरुणीवर नराधमानं अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन आरोपीविरोधात भादंवि कलम 376 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला सीबीडी बेलापूर येथे तिच्या मावशीच्या घरी गेली होती, तिथून तिनं घरी परतण्यासाठी नवी मुंबई ते गोरेगाव रिक्षा बुक केली. रिक्षा आरे कॉलनीत पोहचली, त्यावेळी रिक्षा चालकानं रिक्षा एका निर्जन स्थळी नेली.

तिथे त्यानं आधी महिलेला मारहाण केली आणि त्यानंतर महिलेवर जबरदस्ती करत बलात्कार केला. त्यानंतर नराधमानं महिलेला घडलेल्या घटनेबाबत कुठेच वाच्यता न करण्याबाबत धमकावलं आणि घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर त्यानं थेट उत्तर प्रदेश गाठलं. 

इंद्रजित सिंह असं आरोपीचं नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो मुंबईत रिक्षा चालवत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

साधारणतः काही महिन्यांपूर्वी पीडित महिलेची प्रसूती झाली होती. पण घटनेच्या काही दिवसांनी महिलेला रक्तस्त्राव होऊ लागला. कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत महिलेच्या सर्व चाचण्या करुन घेतल्या. त्यावेळी डॉक्टरांना तपासणी दरम्यान महिलेच्या शरीरावर काही जखमा आढळून आल्या.

डॉक्टरांना संशय आला, त्यावेळी त्यांनी महिलेला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली. त्यानंतर महिलेनं तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत डॉक्टरांना आणि कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबियांना घडला प्रकार समजताच त्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्थानक गाठलं आणि गुन्हा दाखल केला. 
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा