लोहमार्ग पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा

 wadala
लोहमार्ग पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा
लोहमार्ग पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा
See all

डाळा - दहशतवादी कारवायांचे सावट आणि सणांच्या पार्श्वभूमीवर वडाळा लोहमार्ग पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या नेतृत्वाखाली हा आढावा घेण्यात आला.

यावेळी कोणताही घातपात किंवा अनुचित प्रकार रोखण्यासाठी कशी खबरदारी घ्यायची. रेल्वे स्थानक परिसरातील संशयास्पद व्यक्ती, वस्तूची माहिती कशी द्यायची, याचे प्रशिक्षण देण्यात आले. या बैठकीला लोहमार्ग अधिकारी वर्ग, कमांडो मंगेश साळवी, संतोष गव्हाणे आणि रेल्वे पोलीस प्रवासी मित्र उपस्थित होते.

Loading Comments