शिवसेना उपविभाग प्रमुखावर गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेकडून एकाला अटक


शिवसेना उपविभाग प्रमुखावर गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेकडून एकाला अटक
SHARES

विक्रोळी येथे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर यांच्यावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी गुन्हेशाखेच्या पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. सागर जाधव(४०) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपींना हल्ल्याप्रकरणात मदत केल्याचा आरोप सागरवर आहे. या घटनेत शेखर जाधव जखमी झाले होते. सागरला न्यायालयाने मंगळवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सागर हा घाटकोपर परिसरात राजकीयदृष्ट्या सक्रिय होता. त्याने आरोपींना मदत केल्याचा आरोप असून याप्रकरणी खंडणी विरोधी पथक अधिक तपास करत आहे.

हेही वाचाः- ईडीच्या कार्यालावर शिवसैनिकांनी लावलं भाजपा प्रदेश कार्यालयाचे पोस्टर

विक्रोळीतील टागोरनगर मधील साई मंदिर परिसरात गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात हल्ला घडला होता या हल्ल्यात जाधव यांच्या डाव्या खांद्यावर गोळी लागली होती. याप्रकरणी एका हल्लेखोर सागर सिंग याला घटनास्थळी अटक झाली होती. भरसकाळी भरवस्तीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे विक्रोळीतील टागोर नगर परिसरात घबराट पसरली होती. यापूर्वी याप्रकरणी मध्यप्रदेशातून कृष्णधर सिंगला, तर ठाण्यातून आनंद फडतरे यांना अटक केली होती.  त्यांच्या चौकशीत उमेश शेट्टीचे नाव समोर आले होते. शेट्टीने सागर याला दुचाकी दिली होती. त्यानंतर गोळीबारा पुर्वी रेकी केली होती. गोळीबार झाल्यानंतर त्याने बंगळूरू येथे आश्रय घेतला. मात्र तो नवी मुंबई येते आल्याननंतर त्याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणी जाधवला अटक करण्यात आली आहे.

चीन आणि भारताच्या खराब संबधाचा पुजारीला फायदा

गुन्हे शाखेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद पुजारी सध्या चीनमध्ये लपून बसले आहे. भारत आणि चीन या देशांमध्ये सध्या संबध खराब असल्यामुळे त्याला भारतात आणण्यात अडचणी येत आहेत. तो मार्च २००८ मध्ये चीनमध्ये टूरिस्ट व्हिसावर गेला होता आणि तेथे त्यांना तात्पुरत्या रहिवासीस परवानगी देण्यात आली होती, ती मार्च २०१२ मध्ये संपली. सध्या प्रसाद पुजारी चीनच्या 'शेन्झेन सिटी' 'लुहो' जिल्ह्यात राहत आहेत. मुंबईत प्रसाद पुजारी यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि आतापर्यंत त्यांच्या १३ हस्तकांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्याच वर्षी प्रसाद पुजारीच्या टोळीतील लोकांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने प्रसाद पुजारीची आई इंदिरा पुजारी हिला अटक केली होती. त्याचा चुलत भाऊ सुरेशकुमार पुजारी याला विकसकाकडून दहा लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरा पुजारी यांनी शिवसेना नेते नेमबाजी प्रकरणात नेमबाज सागर मिश्रा यांच्या खात्यात ५० हजार रुपये जमा केल्याचा आरोप आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा