अंधेरीतल्या पब अॅण्ड बारवर पोलिसांची कारवाई, १९६ जणांवर कारवाईचा बडगा

धडक कारवाईमध्ये पोलिसांनी १९६ जण ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामध्ये १७१ पुरूष आणि महिला ग्राहकांचा समावेश आहे.

अंधेरीतल्या पब अॅण्ड बारवर पोलिसांची कारवाई, १९६ जणांवर कारवाईचा बडगा
SHARES

आधीच कोरोना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस अहोरात्र मेहनत घेत असताना. दुसरीकडे काही टवाळखोरांकडून नियम पायदळी तुडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अंधेरीत (Andheri) कोविड नियमांचे उल्लघंन करून बार आणि पबमध्ये वावरणाऱ्या १९६ जणांवर रविवारी पोलिसांनी धडक कारवाई केली. या सर्वांवर १८८ (COVID १९ Lockdown Guidelines)अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचाः- ९ गडी राखून मुंबईचा दिल्ली विरोधात दमदार विजय

मुंबईच्या साकीनाका परिसरातील एका बारमध्ये सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर बसवून बिन दिक्कत बार आणि पब सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या समाज सेवा शाखेला मिळाली होती. त्यानुसार रविवारी पोलिसांनी सापळा रचून या बारवर कारवाई केली. या धडक कारवाईमध्ये पोलिसांनी १९६ जण ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामध्ये १७१ पुरूष आणि महिला ग्राहकांचा समावेश आहे. तर १९ कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यांच्यासोबतच २ मालक, ३ मॅनेजर आणि कॅशियरला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचाः- ठाणे मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन

मुंबई पोलिसांनी FIR दाखल करत भारतीय संविधा कलम १८८, २८५ अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामध्ये सरकारी आदेशांचं उल्लंघन, आग व ज्वलनशील पदार्थांकडे दुर्लक्ष अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान नोव्हेंबर महिन्यातही राज्यात सर्वत्र अनलॉक ५ ची नियमावली लागू आहे. कंटेन्मेंट भागात कडक लॉकडाऊन राहणार आहे. राज्यात रेस्टॉरंट आणि बार हे ५०% क्षमतेसह खुले केले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा