Advertisement

अंधेरी, जोगेश्वरी पूर्वमध्ये कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू

कोरोनामुळे मुंबईत आतापर्यंत ७,२१९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक मृत्यू हे अंधेरी आणि जोगेश्वर पूर्वमध्ये झाले आहेत.

अंधेरी, जोगेश्वरी पूर्वमध्ये कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू
SHARES

कोरोनामुळे मुंबईत आतापर्यंत ७,२१९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक मृत्यू हे अंधेरी आणि जोगेश्वरपूर्वमध्ये झाले आहेत. अंधेरी आणि जोगेश्वर पूर्वमधील कोरोना बळींची संख्या ५०३ आहे.    

मुंबईमध्ये मंगळवारी कोरोनाचे ९३१ नवे रुग्ण आढळले आहेत. तर मात्र  ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४० रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यात ३१ पुरुष व १८ महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी तिघांचे वय ४० वर्षे होते.

मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा वेग आता घटला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर ०.७९ टक्के झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ८९ दिवसांवर गेला आहे. मात्र, बोरिवली, नानाचौक-मलबार हिल, गिरगाव येथील रुग्णसंख्या वाढीचा दर अधिक आहे.

मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे १ लाख ३० हजार रुग्ण आढळले आहेत. यामधील  १ लाख ५ हजार १९३ रुग्ण म्हणजेच ८० टक्के रुग्ण बरे झाले आहेत.  सध्या १७,६९७ रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण बोरिवली भागात आहेत.

गेल्या २४ तासांत राज्यात ४२२ जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. ११,११९ नवे रुग्ण याच काळात आढळले. राज्यातील मृतांची संख्या २०,६८७ झाली आहे. 



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा