MIDC चा सर्व्हर हॅक केल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) सर्व्हरवर “मालवेयर हल्ला” करणाऱ्या अज्ञात व्यक्तींवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

MIDC चा सर्व्हर हॅक केल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल
SHARES

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) सर्व्हरवर “मालवेयर हल्ला” करणाऱ्या अज्ञात व्यक्तींवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्याचा एमआयडीसी पोर्टलच्या डेटाबेसवर परिणाम झाला. शहरातील सायबर पोलिस स्टेशनमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये (आयटी अ‍ॅक्ट) अंतर्गत हे प्रकरणं नोंदवण्यात आलं.

२१ मार्चला एमआयडीसीचा सर्व्हर हॅक करणाऱ्या हॅकर्सकडून तब्बल पाचशे कोटींची मागणी करण्यात आली आहे. या हॅकर्सनं MIDC च्या अधिकृत मेल आयडीवर ५०० कोटींच्या मागणीचा मेल केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या सोमवारपासून एमआयडीसीचा सर्व्हर हॅक झाला आहे. यामुळे मुंबईतील मुख्य कार्यालयासह राज्यातील सोळा प्रादेशिक कार्यालयातील संपूर्ण कामकाज बंद पडले आहे. Midc च्या अधिकृत मेल करत हॅकर्सनं ५०० कोटी रुपयांची मागणी केली होती. जर ही मागणी पूर्ण केली नाही, तर डेटा हॅक करण्यात आलेल्या सर्व्हरवरील संपूर्ण महत्वाचा डेटा नष्ट करु, अशी धमकी देण्यात आली होती.

एमआयडीसीशी संबंधित सर्व औद्योगिक वसाहती, उद्योजक, शासकीय घटक आणि विविध योजनांची संपूर्ण माहिती ही एका ऑनलाईन सिस्टिमवर आहे. या सिस्टिम सर्व्हरचा डेटा हॅक झाला आहे. त्यामुळे गेल्या सोमवारपासून संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. एमआयडीसीतील कॉम्प्युटर सुरू केल्यानंतर त्यात व्हायरस दिसत आहे. त्यामुळे जर या सिस्टिममध्ये प्रवेश केला, तर डाटा नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे एमआयडीसीनं सर्व कार्यालयांना कॉम्प्युटर सुरू करू नका, अशी सूचना केली आहे.

दरम्यान याआधीही गेल्यावर्षी मुंबई आणि परिसरातील वीज गायब होण्यामागे चिनी सायबर हल्ल्याचा संशय गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता MIDC चा डेटा हॅक झाल्याची माहिती समोर येताच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

 


हेही वाचा

अंबानीच्या घराजवळ स्काॅर्पिओ पार्क करणारा सचिन वाझेचा ड्रायव्हर, एनआयएचा दावा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा