कायद्यात राहून आंदोलन करा अन्यथा कारवाईला सामोरे जा... परमबीर सिंह

आयुक्त पदाची सूञे हाती घेताच परमबीर यांऩी शहरातील कायदा व सुव्यवस्थे विरोधात पाऊले उचलणाऱ्यांना दम भरला

कायद्यात राहून आंदोलन करा अन्यथा कारवाईला सामोरे जा... परमबीर सिंह
SHARES
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांनी शनिवारी दुपारी 3 च्या सुमारास निवृत्त माजी पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्याकडून मुंबई पोलिस आयुक्तपदाचा पदाभार स्वीकारला. एक डँशिंग अधिकारी म्हणून परमबीर सिंह हे पोलीस दलात परिचित आहेत. मुंबईतील कायदा व सुव्यवस्था आणि महिलांची सुरक्षा यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करणार असल्याचे परमबीर यांनी पञकारांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्र पोलीस दलात गेली ३२ वर्षे अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेले परमबीर सिंह हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पोलीस दलातील एक कार्यक्षम व धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. विविध ठिकाणच्या पोलीस दलाचे प्रमुख म्हणून अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा छडा लावण्यात त्यांना यश आलं आहे. त्यांनी याआधी ठाण्याचं पोलीस आयुक्तपद भूषवलं आहे. गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळं ठाणे शहरातील गुन्ह्यांमध्ये १० टक्क्यांची घट झाली होती. तसंच, गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाणही वाढलं होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी मीरा रोड कॉल सेंटर प्रकरण, सैन्य भरती प्रकरण, अमेरिकेच्या ड्रगविरोधी पथकाने लक्ष घातलेल्या २ हजार कोटींचं ड्रग प्रकरण, बेकायदेशीर कॉल रेकॉर्डिंग अशा अनेक प्रकरणांचा तपास केला. सिंह यांनी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपप्रमुख म्हणूनही काम पाहिलं आहे. परमबीर सिंह यांनी चंद्रपूर आणि भंडऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केलं आहे. महाराष्ट्र कायदा व सुव्यवस्थेचे अतिरिक्त DGP म्हणूनही काम पाहिले आहे. 

आयुक्त पदाची सूञे हाती घेताच परमबीर यांऩी शहरातील कायदा व सुव्यवस्थे विरोधात पाऊले उचलणाऱ्यांना दम भरला आहे. तर सीएए आणि एनसीआरपी विरोधात परवानगी नसताना, कायदा हातात घेण्याचा किंवा नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. तर मुंबईत महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाय योजना करणार असल्याचे सांगितले. त्याच बरोबर मुंबई पोलिसांनी मागील काही दिवसात अंडरवल्डशी संबधित गुंडांच्या मुस्का आवळल्या असून त्यात पोलिस अधिकाऱ्यांना सर्वोतपरी मदत करण्याचे आवाहन दिले आहे. तसेच या पूर्वीचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी उत्तमरित्या  मुंबईची कायदा व सुव्यवस्था हाताळली असून त्यांनी केलेले काम पुढे सुरुच ठेवणार असल्याची माहिती परमबीर यांनी दिली.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा