यूपीत बँक लुटणारा पोलिसांच्या तावडीत


यूपीत बँक लुटणारा पोलिसांच्या तावडीत
SHARES

उत्तर प्रदेशात घातक शस्त्राद्वारे बँक लुटून फरार झालेल्या मुख्य आरोपीला गुन्हे शाखा 9 च्या पोलिसांनी दिवा येथून अटक केली आहे. अभिषेक नेपाळ सरोज असं या आरोपीचं नाव आहे. यूपीमध्ये त्याच्या विरोधात दरोडा आणि लुटीच्या पाच ते सहा गुन्ह्यांची नोंद असून यूपी पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्यास एक लाखाचं बक्षीस जाहीर केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली.


 13 लाखांची लूट

उत्तर प्रदेशमध्ये सप्टेंबर 2018 मध्ये सुलतानपूर येथील हरिहरपूर गावाजवळील बँक ऑफ इंडिया बँकेच्या दोन शाखांमध्ये काही जणांनी घातक शस्त्राचा धाक दाखवत दरोडा टाकला होता. त्यावेळी पाच आरोपींनी 13 लाखांची लूट बँकेतून केली होती.

कालांतराने  हे सर्व आरोपी फरार झाले होते. यातील मुख्य आरोपी दिवा येथे वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखा 9 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाली होती. या आरोपीवर यूपीतील विविध पोलिस ठाण्यात दरोडा, लुटीचे तब्बल पाच ते सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

अखेर गुन्ह्यांची कबुली

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दिवा परिसरातून अभिषेक सरोजला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. अभिषेक हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याचा ताबा पुढील तपासासाठी यूपी पोलिसांना देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांनी दिली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा