मुस्लिम महिलांची बदनामी प्रकरण : मुंबई पोलिसांकडून एकाला अटक

मुस्लिम महिलांची इंटरनेटवर बदनामी होत असल्याचा आवाज सर्वप्रथम शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उठवला होता.

मुस्लिम महिलांची बदनामी प्रकरण : मुंबई पोलिसांकडून एकाला अटक
SHARES

मुस्लिम महिलांची बुली बाई या अ‍ॅपवरून बदनामी करणाऱ्या एकाला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांनी बंगळुरू इथून एका २१ वर्षीय युवकाला ताब्यात घेतलं आहे. तो इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे.

मुस्लिम महिलांची इंटरनेटवर होत असलेल्या बदनामी विरोधात रविवारी दक्षिण मुंबईतील एका पोलिस ठाण्यात आयटी कायदा आणि आयपीसी सेक्शन अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिटहब प्लॅटफार्मच्या बुली बाई या अ‍ॅप्सच्या माध्यमातून महिलांचे फोटो एडिट करुन आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी रविवारी दाखल केलेल्या गुन्ह्यात आयपीसी कलम 153- ए ( धार्मिक आधारावर दोन समुदायामध्ये भेदभाव), कलम 153-बी ( जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावणे), 354-डी ( पाठीमागे लागणे), 509 (महिलांची बदनामी करण्याचा प्रयत्न) आणि कलम 500 (अपराधिक मानहानी) या कलमाखाली मुंबई सायबर सेलनं गुन्हा दाखल केला आहे.

दिल्ली पोलिसांनी सोमवारी डॉजी अ‍ॅप्लिकेशनच्या डेव्हलपर्सला गिटहब प्लेटफार्मविषयी अधिकची माहिती मागितली होती. तर ट्विटरला देखील महिलांशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. पोलिसांनी ट्विटरवर गिटहबसंबंधी सर्वात अगोदर ज्या व्यक्तीनं ट्विट केलं होतं, त्याविषयी माहिती मागितली आहे.

मुस्लिम महिलांची इंटरनेटवर बदनामी होत असल्याचा आवाज सर्वप्रथम शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उठवला होता. त्यांनी बुली अ‍ॅपला बंदी घालण्याची मागणी केली होती. प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना देखील यासंबधी लवकरात-लवकर कारवाई करावी अशी मागणी केली होती.

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या तक्रारीवरुन केंद्रीय आयटी विभागानं बुली बाई या अ‍ॅप्सला ब्लॉक केलं आहे. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी रात्री प्रियंका गांधींनी ट्विट करत अ‍ॅपला बंदी घातल्यात आल्याची माहिती दिली होती.



हेही वाचा

रेल्वे स्टेशनवर महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न

मालकाकडून नोकराची हत्या, दोघांना अटक

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा