पतंगीच्या मांजाने अधिकाऱ्याचा गळा चिरला


पतंगीच्या मांजाने अधिकाऱ्याचा गळा चिरला
SHARES

मकरसंक्रांतीचा सण जवळ येऊ लागतो तसतसे पतंग उडवण्याचा ज्वर टिपेला पोहोचत जातो. मात्र पतंगीच्या धार धार मांजा वरळीतील एका अधिकाऱ्याच्या जिवावर बेतला. दुचाकीहून जात असताना. पतंगीचा मांजा गळ्यात अडकल्याने त्याचा गळा कापला गेला. वेळीच उपचार मिळाले म्हणून अन्यथा अधिकाऱ्याच्या जिवावर बेतले असते. दरम्यान आता रेल्वे परिसरात पंतग उडवणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई करण्यात आदेश दिले आहेत. कारण पंतगीच्या मांडा ओव्हरवायर वायरवर पडल्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत आहेत. त्याचा परिणाम रेल्वेच्या वेळपत्रकावर ही होता. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने परिसरात पंतग उडवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.

मकरसंक्रांत आणि पतंग हे समीकरण असून या कालावधीत अनेक जण हौसेने पतंग उडवतात. प्रतिस्पध्र्याचा पतंग कापण्यासाठी धारदार मांज्यांना तरुणांची पसंती असते. त्यामुळे बाजारात धातूमिश्रित तसेच काचमिश्रित मांज्यांची मोठी चलती आहे.मात्र हेच मांजे सध्या  घातक आहे. वरळी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश गवळी हे १६ जानेवारी रोजी सेशन कार्टसाठी दुचाकीहून जात होते. ते जे.जे. जंक्शनहून जात असताना. अचानक त्यांच्या गळ्यात मांजा अडकला. वेगात जात असलेल्या गवळी यांचा या मांजाने गळा चिरला. तेथे उपस्थित असलेल्या ट्रॅफिक हवालदार शिंदे यांनी तात्काळ याची माहिती वरिष्ठांना दिली आणि जवळ असलेल्या जेजे रुग्णालयात त्यांना नेलं. परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त परमजीत सिंह दहिया यांनी तात्काळ उपचार व्हावे यासाठी गवळी यांना वोकहार्ट रुग्णालयात दाखल करून घेतल. आणि प्लास्टिक सर्जन बोलवून तात्काळ उपचार सुरू केले. राकेश गवळी यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवण्यात आले. राकेश गवळी अगदी थोडक्यात बचावले असून त्यांच्या गळ्याला १० टाके पडले असून त्यांचा आवाज ही थोडक्यात बचावले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा