मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 'डोंगरी'तून १५ कोटींचे ५ किलो हिरोईन जप्त

मुंबईत पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी तब्बल १५ कोटींचे ५ किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त केलं आहे.

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 'डोंगरी'तून १५ कोटींचे ५ किलो हिरोईन जप्त
SHARES

केंद्रिय अमली पदार्थ विरोधी पथकानं (एनसीबी) नुकताच क्रूझ ड्रग्ज पार्टीवर कारवाई केली. त्यानंतर आता मुंबईत पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी तब्बल १५ कोटींचे ५ किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी डोंगरी परिसरातून २ जणांना अटक केली आहे.

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकानं डोंगरी परिसरातून दोघांना अटक केली आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर ही मुंबई पोलिसांनी केलेली मोठी कारवाई आहे. कारवाई केलेला आरोपी राजस्थानमधील निवासी असून, ते मुंबईत ग्राहकांना प्रतिबंधित अमली पदार्थ विक्रीसाठी आले होते', मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्पष्ट केलं.

गुप्त माहितीच्या आधारावर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एएनसीने दोन्ही आरोपींना दक्षिण मुंबईतील डोंगरी भागातून अटक केली आहे. त्यांच्या तपासादरम्यान आरोपींकडून तब्बल ७ किलो हेरोइड सापडली आहे.

क्रूझ जहाजाशी किंवा त्याच्या समुद्रसपाटीबद्दल इतर परवानग्या संबंधित काही उल्लंघन होते की नाही याबाबत आम्ही डीजी, शिपिंग कॉर्पोरेशनला पत्र पाठवू, असे देखील नगराळे यांनी पुढे सांगितले. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा