रवि पुजारीची ‘कुंडली’ तयार

मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने आठवड्याभराच्या मेहनतीनंतर पुजारीवरील 43 गंभीर गुन्हयांची माहीती तयार केली आहे. लवकरच रवि पुजारीची ‘कुंडली’ ही दिल्लीतील सुरक्षा यंत्रणेला पाठवली जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

रवि पुजारीची ‘कुंडली’ तयार
SHARES

अफ्रिकेच्या सेनेगलमध्ये इंटरपोलच्या मदतीने डीआयसीच्या अधिकार्यांनी 22 जानेवारी रोजी रवि पुजारीला अफ्रिकेच्या सेनेगल येथे अटक केली. त्यानंतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने रवि पुजारीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू केले. रवि पुजारीवर सर्वाधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद ही मुंबईत आहे. रविच्या प्रत्यार्पणासाठी ही माहिती महत्वाची ठरू शकते. या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणेने मुंबई पोलिसांना रवि पुजारीवरील गुन्ह्यांची माहिती मागवली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने  आठवड्याभराच्या मेहनतीनंतर पुजारीवरील 43 गंभीर गुन्हयांची माहीती तयार केली आहे. लवकरच रवि पुजारीची ‘कुंडली’ ही दिल्लीतील सुरक्षा यंत्रणेला पाठवली जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

तपास यंत्रणा होती रविच्या मागावर

कुख्यात गुंड रवी पुजारीला २२ जानेवारीला अफ्रिकेच्या सेनेगलमध्ये अटक करण्यात आली. त्याच्या अटकेची माहिती २६ जानेवारीला भारतीय दुतावासाला देण्यात आली. रवी पुजारीवर खंडणी, अपहरण, खून, ब्लॅकमेल आणि फसवणुकीचे आरोप आहेत. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस यापूर्वीच जारी करण्यात आली होती. रवी पुजारी ऑस्ट्रेलियालात लपला असल्याचा पोलिसांना संशय होता. भारतीय गुप्तचर यंत्रणा सतत रवी पुजारीवर लक्ष ठेवून होत्या. पण तो पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासोमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. तेव्हापासून तपास यंत्रणा त्याच्या मागावर होते.

रवि पुजारीवर 43 गंभीर गुन्ह्यांची नोंद

रवी पुजारीवर अनेक राज्यांमध्ये खंडणी तसंच हत्येचे गुन्हे दाखल आहेत. महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांनी रवी पुजारीचे दोन हस्तक . विलिअम रॉड्रिक्स आणि आकाश शेट्टी यांना अटक केली. या दोघांच्या चौकशीतून रवी अफ्रिकेत लपल्याचे पुढे आल्यानंतर इंटरपोलच्या मदतीने त्याला अटक केल्याचे बोलले जातं. मुंबईत रविवर सर्वाधिक 43 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांमध्ये काही महत्वाचे सेलिब्रिटींची ही नोंद आहे. हे गुन्हे रविच्या प्रत्यार्पणासाठी महत्वाचे ठरू शकतात.

मुंबई पोलिसांचे पथक दिल्लीला जाणार?

रवि पुजारीच्या वकिलांनी सेलेगन मध्ये कुख्यात गुंड रवि पुजारी हा नसून हा अँन्थोनी फर्नांडिस असल्याचा दावा केला होता. मात्र हा दावा खोडून काढण्यासाठी पोलिस रविने छोटा राजन सोबत त्याने केलेल्या कामावर ही पोलिस प्रकाश टाकणार आहेत. तसेच पोलिस छोटा राजन, कुमार पिल्लई यांचा जबाब ही जोडण्यात येणार असल्याचे कळते. आठवड्याभरात  रविवरील गुन्ह्यांची यादी जमा करण्यात यावी असे आदेश सुरक्षा यंत्रणेने मुंबई पोलिसांना दिले होते. शनिवारी रवि पुजारीच्या “कुंडली”चे काम संपुष्ठात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. लवकरच ही माहीती घेऊन मुंबई पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना होणार असल्याचे समजते.

 हेही वाचा

1993 च्या स्फोटातील मुख्य आरोपी अबू बकरला दुबईत अटक

मुंबईतील दुहेरी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड हानिफ सईदचा मृत्यू
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा