1993 च्या स्फोटातील मुख्य आरोपी अबू बकरला दुबईत अटक


1993 च्या स्फोटातील मुख्य आरोपी अबू बकरला दुबईत अटक
SHARES

मुंबईत 12 मार्च 1993 रोजी झालेल्या 13 साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अबू बकर उर्फ अबू बकर अब्दुल गफूर शेखसह फिरोज नावाच्या व्यक्तीला दुबईत अटक करण्यात आली आहे. अबू बकर हा दाऊद इब्राहिमचा खास हस्तक आहे. बॉम्बस्फोटापूर्वी अबू बकरने काश्मीर व्याप्त पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेतली होती. मुंबईत ब्लास्ट घडविण्यासाठी आरडीएक्स मुंबईत आणण्यात त्याचा महत्वाचा हात होता.

दाऊदच्या साम्राज्याला धक्का

1993च्या स्फोटात अबू बकरचा मोठा हात होता. या स्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता. तर 700 हून अधिक जण जखमी झाले होते. या स्फोटात शेकडो जखमींना त्यानंतर कायमचे अंपगत्व आले. तर स्फोटात 7 कोटी रुपयांच्या सरकारी संपत्तीचे नुकासान झाले होते. अबूने स्फोटापूर्वीच देश सोडला होता. त्यामुळे 1997 साली अबू बकर विरोधात सुरक्षा यंत्रणेने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. दाऊदसाठी अबू बकर आणि मुस्तफा दौसा हे दोघेही पूर्वी मुंबईत स्मगलिंग करत होते. काही वर्षांपूर्वीच अबू बकरने एका इराणी महिलेशी दुसरा विवाह केला. दाऊदचा दुबईतील कारभार अबू हा पाकिस्तानातून संभाळत असल्याचे पुढे आले होते.

प्रत्यार्पणासाठीच्या प्रयत्नास सुरूवात

अबू बकरला दुबईत अटक केल्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास यंत्रणेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी दिल्लीतील सुरक्षा यंत्रणांनी अबू विरोधातील गुन्हे आणि इतर माहिती मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाकडे शनिवारपर्यंत मागितीली आहे. अबूच्या अटकेमुळे दाऊदच्या साम्राज्याला आणखी एक धक्का बसला आहे. अबू बकर गेल्या अनेक वर्षांपासून यूएईत वास्तव्यास होता.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा