खबरदार जर सुसाट बाईक चालवाल!

 Marine Drive
खबरदार जर सुसाट बाईक चालवाल!

मरिन ड्राइव्ह - बेफाम गाडी चालवणाऱ्या रायडर्सना मुंबई पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. एकूण 11 रायडर्सना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शनिवारी रात्री मरिन ड्राइव्हवर बाइक रेसिंग सुरू होती. त्या दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली.

शनिवारी रात्री ट्रॉम्बे येथे जमावाला पांगवून परतत असताना सह पोलीस आयुक्त देवेन भरती यांना मरिन ड्राइव्हवर मध्यरात्रीच्या सुमारास सुसाट जाणारे बाइकर्स आढळले. तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला कळवून सगळ्यांना सतर्क केले. त्यानंतर या सगळ्यांना पकडण्याची कसरत सुरू झाली. काही ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली. अक्षरश: प्रत्येक बाइकचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांना पकडलं. तीन दुचाकीस्वार या वेळी पळाले असले तरी उर्वरित 11 दुचाकीस्वारांना पोलिसांनी पकडलं.

या वेळी पोलिसांनी केटीएम, पल्सर, यामाहा, एफझेडसारख्या एकूण 14 दुचाकी जप्त केल्या. असं सांगितलं जातंय की वेग वाढवण्यासाठी या दुचाकी मॉडिफाईड करण्यात आल्या होत्या.

Loading Comments