COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

महिलांवरील अत्याचार प्रकरणात मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

मुंबईत ५९९५ हिंसक गुन्हे दाखल झाले होते. याबाबतही दिल्लीदेशात प्रथम स्थानावर आहे. दिल्लीत ११ हजार ३१३ हिंसक गुन्हे दाखल झाले होते.

महिलांवरील अत्याचार प्रकरणात मुंबई तिसऱ्या क्रमांकावर
SHARES

देशातील १९ मोठ्या शहरांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांचा विचार केल्यास मुंबईत तुलनात्मक वाढ झाली आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये मुंबई  तिस-या स्थानावर पोहोचली आहे. २०१८ मध्ये दाखल गुन्ह्यांबाबत मुंबईत देशात चौथ्या क्रमांकावर होती. मुंबईत २०१९ मध्ये ६ हजार ४३८ महिलांवरील गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यातील ५३२८ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलेले आहे. तर २०१८ मध्ये ५ हजार ९७८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून ४ हजार ८१५ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. 

 हेही वाचाः- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आरे आंदोलकांवरील आरोप मागे घेण्याचे निर्देश

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या(एनसीआरबी) २०१९ च्या गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, मुंबईत ६० हजार ८२३ गुन्हे दाखल झाले होते. त्या तुलनेत दिल्लीत तीन लाख ११ हजार ०९२ , तर चेन्नईमध्ये ७१ हजार ९४९ गुन्हे दाखल झाले होते. २०१८ मध्ये सूरत याबाबत तिस-या क्रमांकावर होते. २०१९ मध्ये सूरत चौथ्या क्रमांकावर पोहोचले असून मुंबईने सूरतला मागे टाकत त्याचे स्थान मिळवले आहे. दरम्यान, प्रति लाख लोकसंख्येमागे मुंबईत दाखल गुन्ह्यांचे प्रमाण फार कमी आहे. मुंबईत प्रति लाख लोख्यसंख्येमागे ३३०.३  गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्याबाबत दिल्ली आघाडीवर आहे. दिल्लीत हे प्रमाण १९०६.८ आहे. त्यापाठोपाठ कोची(१७११.२), जयपूर(१३९२.५) व सूरत(११७९.७) यांचा क्रमांक आहे. पुणे याबाबत मुंबईच्या मागे आहे. पुण्यात प्रति लाख लोकसंख्येमागे गुन्ह्यांचे प्रमाण ३२०.४ आहे.

हेही वाचाः-चेंबूरमध्ये मेट्रो ४ लाईनसाठी १८ झाडं तोडण्यास महापालिकेची परवानगी

गंभीर गुन्ह्यांचा विचार केल्यास मुंबई देशात चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईत २०१९ मध्ये १७० हत्येचे गुन्हे दाखल झाले होते. दिल्ली याबाबत प्रथम क्रमांकावर आहे. दिल्लीत ५२०, बंगळुरूमध्ये २१०व चेन्नईत (१७७) हत्येचे गुन्हे दाखल झाले होते. हत्येच्या प्रयत्नाबाबत मुंबई देशात तिस-या क्रमांकावर आहे. मुंबईत हत्येच्या प्रयत्नाचे ३४३ गुन्हे दाखल झाले होते. हिंसक गुन्ह्यांबाबत मुंबईत देशात दुस-या क्रमांकावर आहे. मुंबईत ५९९५ हिंसक गुन्हे दाखल झाले होते. याबाबतही दिल्ली देशात प्रथम स्थानावर आहे. दिल्लीत ११ हजार ३१३ हिंसक गुन्हे दाखल झाले होते. अपहरणाच्या गुन्ह्यांत मुंबई दिल्ली पाठोपाठ दुस-या क्रमांकावर आहे. दिल्लीत पाच हजार ७४६ गुन्ह्यांची नोंद झाली होती. तर मुंबईत असे दोन हजार १०२ अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यामुळे त्याप्रकरणी अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात येतात. त्यामुळे हे प्रमाण देशात अधिक आहे. अपहरणाबाबत बंगळुरू(१०५३) तिस-या क्रमांकावर आहे.

मुंबईत खंडणी व ब्लॅकमेलिंगचे सर्वाधिक म्हणजे २५५ गुन्हे दाखल झाले होते. त्या पाठोपाठ  चेन्नई (२१३), दिल्ली(१७९) व हैद्राबाद(१३९) यांचा क्रमांक लागतो. शहरात दंगलीचेही सर्वाधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. २०१९ मध्ये मुंबईत दंगलीचे ३६१ गुन्हे दाखल झाले होते. त्या पाठोपाठ पटना(२२५), कोझीकोडे(२१५), बंगळुरू(१९२) व पुणे(१५३) यांचा क्रमांक लागतो.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा