तब्बल दोन महिन्यानंतर मुंबईतील ‘ट्राँफिक’ पून्हा जॅम

लोकल बंद असल्यामुळे नागरिकांनी खासगी वाहनं, रिक्षा, टॅक्सी द्वारे कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी बाहेर पडल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून शुकशुकाट असलेल्या मुंबईच्या रस्त्यावर सोमवारी वाहनांची तुफान गर्दी पहायला मिळाली.

तब्बल दोन महिन्यानंतर मुंबईतील ‘ट्राँफिक’ पून्हा जॅम
SHARES

] महाराष्ट्रात आज (8 जून) पासून मिशन बिगिन अगेनच्या तिसर्‍या टप्प्याला सुरूवात होत आहे. त्या पाश्वभूमिवर आजपासून मुंबईमध्येही सरकारी आणि खाजगी कार्यालयामध्ये 10% कर्मचार्‍यांच्या उपस्थितीमध्ये कामकाजाला शासनाने परवानगी दिली. लोकल बंद असल्यामुळे नागरिकांनी खासगी वाहनं, रिक्षा, टॅक्सी द्वारे कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी बाहेर पडल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून शुकशुकाट असलेल्या मुंबईच्या रस्त्यावर सोमवारी वाहनांची तुफान गर्दी पहायला मिळाली.

हेही वाचाः-  दिलासादायक! अखेर 'या' तारखेला मुंबईत दाखल होणार मान्सून

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी देशात लाँकडाऊन जाहिर केले. त्या दिवसापासून मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांंची वरदळ पूर्णतहा थांबली. गल्लोगल्ली पोलिसांनी नाकाबंदी लावत लाँकडाऊनचे उल्लघंन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरु केली. आतापर्यंत लाँकडाऊनचे उल्लघंन करणाऱ्यावर 1 लाखाहून अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यातील काही शहर वगळता कमी झालेला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंञी यांनी  लाँकडाऊनमध्ये शिथिलता जाहिर केली. त्यामुळे मुंबईच्या टोल नाक्यांवर आता वाहनांची पून्हा गर्दी दिसू लागली आहे. मुंबईमध्ये आजुबाजूच्या विविध शहरातून नागरिक कामासाठी येतात. सध्या रस्ते वाहतूक हा एकच मार्ग असल्याने मुंबई पश्चिम द्रुतगती मार्ग, दक्षिण मुंबईत जाण्यासाठी बीकेसी जंक्शनवर वाहनांच्या लांबच लांब रांगादेखील पहायला मिळाल्या आहेत. 



 

पश्चिम द्रुतगती मार्गावर आज सकाळी डोमॅस्टिक एअरपोर्ट फ्लायओव्हर जवळ अपघातामुळेही दोन्ही बाजूची वाहतूक थांबवल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन शिथील करताना आता ई पासची परवानगीदेखील काढून टाकल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा वाढली आहे. त्यामुळे मुंबई हळुहळू पुन्हा पर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरीही खबरदारी घेणे देखील अत्यावश्यक आहे. मुंबईमध्ये काल (7 जून) च्या रात्री पर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 48 हजार 549 पर्यंत पोहचला आहे. यामध्येही 25 हजार 717 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 21 हजार 196 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दुर्देवाने 1 हजार 636 जणांचा कोरोनामुळे बळीदेखील गेला आहे.


हेही वाचाः- राज्यात दररोज 'इतका' जमा होतो कोविड कचरा

 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा