Advertisement

राज्यात दररोज 'इतका' जमा होतो कोविड कचरा


राज्यात दररोज 'इतका' जमा होतो कोविड कचरा
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी महापालिका व राज्य सरकारानं नागरिकांना सॅनिटायझरचा वापर, तोंडाला मास्क, हातात ग्लोव्हज आणि समाजिक अंतर यांच पालन करण्याचं आवाहन केलं. त्यानुसार, राज्यातील सगळीच जनता हातात ग्लोव्हज आणि तोंडाला मास्क लावत आहे. त्यामुळं या वस्तूंचा कचराही मोठ्या प्रमाणात निघत आहे. राज्यात अशा प्रकारचा १५ टन कोव्हिड कचरा दररोज जमा केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात या कचऱ्याचं प्रमाण दुप्पट झाल्याचं समजतं. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातत रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच कोव्हिड कचऱ्याचं प्रमाण २ दिवसांतच दुपट्टीवर जात २ टनावर गेलं. त्यानंतर एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात त्यात आणखी वाढ होऊन ते प्रमाण ७ टनाच्या जवळ पोहचलं. तर मे महिन्यात हेच प्रमाण दुपट्टीपेक्षा अधिक होऊन दिवसाला सुमारे १४.५८ टन कोव्हिड कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती मिळते.

या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आधीच जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, नागरिकांकडून हा कचरा रोजच्या कचऱ्यामध्येच मिसळला जात असल्यानं चिंता व्यक्त होत आहे. कोरोनाबाधितांवरील उपचारादरम्यान निर्माण होणारा आणि विलगीकरण, अलगीकरण कक्षातील जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्वतंत्र नियमावली २० मार्चला जारी केली. त्यानुसार स्वतंत्रपणे भस्मीकरणाद्वारे या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. त्यासाठी राज्यात ३० ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे.



हेही वाचा -

हार्बर मार्गावर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष रेल्वे सेवेची मागणी

महापालिका, डॉक्टर, नर्स यांच्या प्रयत्नांनंतर धारावीतील रुग्णवाढीचा वेग मंदावला



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा