Coronavirus cases in Maharashtra: 202Mumbai: 77Islampur Sangli: 25Pune: 24Nagpur: 13Pimpri Chinchwad: 12Kalyan: 7Navi Mumbai: 6Thane: 5Yavatmal: 4Vasai-Virar: 4Ahmednagar: 3Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 7Total Discharged: 34BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

चीनमधून आईचा मृतदेह आणण्यासाठी डाॅक्टर मुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

कोरोना व्हायरस पसरण्याच्या भीतीपोटी भारत-चीन विमानसेवा बंद आहे. त्याचा फटका मेहरा कुटुंबीयांना बसला आहे.

चीनमधून आईचा मृतदेह आणण्यासाठी डाॅक्टर मुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
SHARE

मुंबईतील एका कुटुंबासाठी कोरोना व्हायरस परवड करणारा ठरला आहे. मुंबई येथील वांद्रे परिसरात राहणार्‍या डॉ. पुनित मेहरा यांच्या मातोश्री रिटा राजेंद्र मेहरा (६३) यांचा विमान प्रवासादारम्यान चीनमध्ये मृत्यू झाला. मात्र, कोरोना व्हायरसमुळे त्यांचा मृतदेह मेहरा कुटुंबीयांना भारतात आणने मुश्किल झाले आहे. आईचा मृतदेह भारतात आणावा यासाठी डॉ. पुनित मेहरा आणि त्यांचे कुटुंबीय गेले २0 दिवस प्रतिक्षेत आहेत. कोरोना व्हायरस पसरण्याच्या भीतीपोटी भारत-चीन विमानसेवा बंद आहे. त्याचा फटका मेहरा कुटुंबीयांना बसला आहे. दरम्यान, डॉ. पुनीत मेहरा आणि कुटुंबीयांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, परराष्ट्र मंत्रालय आणि बीजिंगमध्ये भारतीय राजदूताला पत्र लिहिले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून आईचा मृतदेह स्वदेशी आणण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती केली आहे.

हेही वाचाः- ...तर फडणवीसांच्या भूमिकेची चौकशी करणार - अनिल देशमुख

डॉ. पुनित मेहरा हे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे उच्च शिक्षणासाठी गेले होते. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे त्यांना घेऊन भारतात येण्यासाठी त्यांच्या ६३ वर्षांच्या आई मातोश्री रिटा राजेंद्र मेहरा मेलबर्नला गेल्या होत्या. दरम्यान, भारतात परतण्यासाठी डॉ. पुनित आणि त्यांच्या आई २४ जानेवारी २0२0 या दिवशी विमानाने बीजिंगमार्गे मुंबईला निघाले. दरम्यान, विमानप्रवासातच रीटा यांचा मत्यू झाला. विमान प्रवासादरम्यान रीटा या विमानातील वॉशरुममध्ये गेल्या. मात्र, बराच वेळ त्या बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे शंका आल्याने डॉ. पुनीत यांनी पाहणी केली असता त्या बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. रीटा यांच्यावर उपचार करण्यासाठी चीनच्या झेंगझोऊ विमानतळावर विमानाचे इर्मजन्सी लँडिंग करण्यात आले. परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घडल्या प्रकारानंतर डॉ. पुनित ७ फेब्रुवारी या दिवशी भारतात आले. त्यांनी आईचे पार्थिव आणण्यासाठी भारतातून प्रयत्न सुरू केले. सध्या स्थितीत रीटा यांचे पार्थिव झेंगझोऊ येथी शवागरात ठेवण्यात आले आहे. चीनमध्ये आरोग्य आणिबाणी असल्याने पार्थीव भारतात आणण्यास विलंब होत आहे, असे डॉ. पुनीत यांनी म्हटले आहे.

७ फेब्रुवारी रोजी डॉ. पुनित भारतात परत आले. मात्र त्यांच्या आईचं पार्थिव आजही झेंगझोऊमधील शवगृहात ठेवण्यात आले आहे. चीनमधील परिस्थिती गंभीर असल्याने पार्थिव आणण्यात विलंब होत असल्याचे डॉ. पुनित यांनी सांगितले. त्यामुळे आपल्या आईचे पार्थिव कधी मायदेशी येणार, याची वाट शोकाकुल मेहरा परिवार वाट पाहत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या