क्रुरतेचा कळस! घरात घुसून सामूहिक बलात्कार, प्रायव्हेट पार्ट्सवर सिगारेटचे चटके

मुंबईत एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे.

क्रुरतेचा कळस! घरात घुसून सामूहिक बलात्कार, प्रायव्हेट पार्ट्सवर सिगारेटचे चटके
SHARES

मुंबईत एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. तीन व्यक्तींनी एका महिलेच्या घरात घुसून सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेनं खळबळ माजली आहे. या नराधमांनी बलात्कार केल्यानंतर पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर सिगारेटने चटके दिले. या सर्व घटनेचा व्हिडीओही काढला.

या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुंबईतील कुर्ला येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मुंबईतील कुर्ला येथे बुधवारी 42 वर्षीय महिलेवर तीन व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बलात्कार केल्यानंतर नराधमांनी त्या महिलेवर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टवर सिगारेटनं चटके दिले.

मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने रविवारी या धक्कादायक घटनेबाबतची माहिती दिली. आरोपी आणि महिला कुर्ल्यातील एकाच परिसरात राहतात. आरोपींनी महिलेच्या घरात घुसून बलात्कार केला. पीडित महिलेसोबत या नराधमांनी अनैसर्गिक अत्याचार देखील केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपींनी पीडित महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर सिगारेटचे चटके दिले. त्याशिवाय धारधार शस्त्रांनी वारही केले. आरोपीमधील एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओही तयार केला. या घटनेबाबात पोलिसांत तक्रार दिल्यास व्हिडीओ व्हायरल करु अशी धमकी आरोपींनी त्या महिलेला दिली.

कुर्ला पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेनं आपल्यासोबत घडलेली घटना शेजाऱ्यांना सांगितली, अन् एका एनजीओसोबत संपर्क करण्यात आला. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी 376 (बलात्कार), 376 डी (सामूहिक बलात्कार), 377 (अनैसर्गिक अत्याचार), 324 (धारधार शस्त्रांनी हल्ला) आणि इतर अन्य कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपी सध्या फरार आहेत. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला असून आरोपींचा शोध घेत आहेत.हेही वाचा

लाइव्ह स्ट्रिमिंग करताना मुंबईत कोरियन युट्यूबरचा विनयभंग, 2 जणांना अटक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा