युपीतील फरार आरोपी मुंबईत जेरबंद

 Pali Hill
युपीतील फरार आरोपी मुंबईत जेरबंद

अँटॉप हिल - उत्तरप्रदेशच्या प्रतापगडमध्ये झालेल्या एका हत्येप्रकरणी फरार आरोपीला अँटॉप हिल पोलिसांनी जेरबंद केलंय. अब्दुल अतिक अब्दुल गफार (27) असं या आरोपीचं नाव आहे. तो उत्तरपरदेशमधल्या प्रतापगडचा रहिवासी आहे.

15 डिसेंबर 2016 ला उत्तरप्रदेशच्या प्रतापगड इथल्या चौकात पूर्ववैमन्यासातून दोन गटात गोळीबार झाला. या गोळीबारात रस्त्यालगत चणे विकणारा प्रसाद गुप्ता (55) याचा बळी गेला होता. तेव्हापासून अब्दुल अतिक अब्दुल गफार फरार होता. अब्दुल अँटॉप हिलच्या म्हाडा कॉलनीत राहत असल्याची माहिती अँटॉप हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. एच. शेख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मोनोरेल जंक्शन परिसरात सापळा रचून अब्दुलला अट केली. चौकशीमध्ये अब्दुलनं हत्या केल्याचे कबुल केले. लवकरच त्याला युपी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Loading Comments