पूर्ववैमन्यसातून गोवंडीत एकाची हत्या


पूर्ववैमन्यसातून गोवंडीत एकाची हत्या
SHARES

                                                           गोवंडी येथील शिवाजी नगर झोपडपट्टीत सहाजणांच्या जमावाने सर्वादेखत दोन तरुणांची हत्या केली. पुर्ववैमनस्यातून घडलेल्य या गुन्ह्य़ात सहभागी असलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक के ली. तर दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेत डोंगरी येथील बालसुधारगृहात पाठवले.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रज्जाब शेरअली खान, प्रेमसिंग विरेंद्रसिंग अशी  मृत तरुणांची नावे आहेत. त्यांचा मित्र महोम्मदअली खान या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. त्याच्याच तक्रोरीवरून पोलिसांनी हल्लेखोरांपैकी बाबू इमाम हुसेन शेख, अमन उर्फ रज्जाक शेख यांना अटक के ली आणि त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमीपैकी एकाच्या पत्नाीला गेल्यावर्षी आरोपींच्या मुलांनी छेडले होते. त्या प्रकरणानंतर या दोन गटांमध्ये वैमनस्य सुरू झाले. दोन दिवसांपुर्वी रमजानच्या तयारीवरून दोन गटांतील वाद उफाळून आला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा