Advertisement

चित्रपट उद्योगासाठी महाराष्ट्र सरकार आणणार नवे प्रोत्साहन धोरण

इतर राज्ये आणि परदेशातील चित्रपट उद्योग प्रोत्साहन मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली.

चित्रपट उद्योगासाठी महाराष्ट्र सरकार आणणार नवे प्रोत्साहन धोरण
SHARES

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाराष्ट्रातील चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी आणि दर्जेदार चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार नवीन प्रोत्साहन धोरण तयार करणार आहे. 

मुंबईतील सह्याद्री गेस्ट हाऊस (Sahyadri Guest House) येथे शेलार यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी चित्रपट निर्माते आणि प्रमुख प्रॉडक्शन हाऊसच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुंबई आणि महाराष्ट्रात चित्रपट निर्मितीदरम्यान येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. विशेषतः शूटिंग परवानग्या, पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक मुद्द्यांवर भर देण्यात आला.

शेलार यांनी सांगितले की, इतर राज्ये आणि परदेशात लागू असलेल्या चित्रपट उद्योग प्रोत्साहन मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात येणार आहे. चित्रपट निर्मात्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदान, सवलती आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून ही समिती तीन महिन्यांत अहवाल सादर करणार आहे.

या बैठकीला टी सिरिज (T-Series), रेड चिलिज इनटरटेंमेंट (Red Chillies Entertainment), धर्मा प्रॉडक्शन (Dharma Productions), जंगली पिक्चर (Junglee Pictures) आणि प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया (Producers Guild of India) यांसारख्या प्रमुख प्रॉडक्शन हाऊसचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आशिष शेलार यांनी पुढे सांगितले की, कोल्हापूर, नागपूरजवळील रामटेक आणि नाशिक येथे नवीन शूटिंग डेस्टिनेशन विकसित करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. तसेच ND Studio चे आधुनिकीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहे. पूर्वीच्या निविदांना कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर फिल्म सिटी प्रकल्पांसाठी हायब्रिड सार्वजनिक-खासगी सहभाग मॉडेल लागू करण्यावरही सरकार काम करत आहे.

चित्रपट निर्मिती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राज्य सरकारकडून सिंगल-विंडो क्लिअरन्स प्रणाली विकसित केली जात आहे, ज्यामुळे सर्व परवानग्या ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. याशिवाय दादासाहेब फालके चित्रनगरी (Dadasaheb Phalke Chitranagari) येथे फिल्म अँड टेलिव्हिजन इनस्टिट्युट ऑफ इंडिया (Film and Television Institute of India) यांच्या सहकार्याने अल्पकालीन फिल्म आणि मीडिया कौशल्य विकास अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत.



हेही वाचा

दहीसर नदीचा कायापालट करण्याची योजना

विरारमधील बहुप्रतिक्षित नारिंगी उड्डाणपूल अखेर खुला

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा