नायगावच्या पोलिस वसाहतीत प्रवेश बंद, पोलिस शिपायाला कोरोना


नायगावच्या पोलिस वसाहतीत प्रवेश बंद, पोलिस शिपायाला कोरोना
SHARES
मुंबईच्या बांगूरनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस शिपायाला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्या पार्श्वभूमिवर तो शिपाई रहात असलेल्या नायगाव येथील पोलिस वसाहत आता पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सील केली आहे. तर त्या शिपायासह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना पोलिसांनी विलगीकरण कक्षात ठेवले असून त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.


नायगाव पोलिस हेडकाँर्टरमध्ये  मध्ये कोरोना बाधित शिपाई त्याच्या कुटुंबियांसोबत रहात होता. त्याला श्वसनाचा ञास होऊ लागल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्यावेळी त्याची करोनाची टेस्ट ही पाँझीटिव्ह आली. त्यानंतर तातडीने पालिका आणि पोलिस कर्मचारी कामाला लागले. त्या शिपायाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना तातडीने विलगीकरण कक्षात हलवत, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तो शिपाई रहात असलेली संपूर्ण इमारत ही सील केलेली आहे. तसेच इमारतीत रहात असलेल्या इतर पोलिस कुटुंबियांना घरपोच वस्तू देण्यात येणार असून त्यासाठी वरिष्ठांच्या परवानगीने दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक, एक हवालदार आणि तीन सहाय्यक फौजदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

माञ पोलिसांना कोरोनाची बाधा होण्याची हा पहिली घटना नाही. या पूर्वी कुरार पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकासह, दोन पोलिस शिपायांना कोरोनाची बाधा झाली होती. आता ही चौथी घटना आहे. त्यामुळे शक्यतो नागरिकांनी सहकार्य करावे व घराबाहेर जाण्याचे टाळावे. नागरिकांना लागणारे किराणा समान, भाजीपाला व औषधे घरी पोहोचवली जातील. त्यामुळे प्रभागातील दिलेल्या दुकानदारांच्या दूरध्वनी क्रमांकाला संपर्क साधून आपल्या सोयी पूर्ण कराव्यात. महानगरपालिकेला आपल्या सहकार्यची अपेक्षा आहे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा