नालासोपाऱ्यात सातव्या मजल्यावरून पडून चिमुरडीचा मृत्यू

नालासोपाऱ्यात दीड वर्षीय चिमुरडीचा इमातीच्या सातव्या मजल्यावरून कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रियल दास असं या दीड वर्षाच्या चिमुपडीचं नाव असून घराच्या बाल्कनिमध्ये खेळताना खाली डोकावून पाहत असताना तोल जाऊन तिचा तोल जाऊन मृत्यू झाला आहे.

SHARE

नालासोपाऱ्यात दीड वर्षीय चिमुरडीचा इमारतीच्या सातव्या मजल्यावरून कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रियल दास असं या दीड वर्षाच्या चिमुपडीचं नाव असून घराच्या बाल्कनिमध्ये खेळताना खाली डोकावून पाहत असताना तोल जाऊन तिचा तोल जाऊन मृत्यू झाला आहे.


संपूर्ण प्रकार

प्रियल दास ही नालासोपाऱ्यातील यशवंत गॅलक्सी कॉम्पेक्समधील संदिप हाईट्स या इमारातीमध्ये तिच्या कुटुंबीयांसोबत राहत होती. ती राहात असलेल्या बाल्कनीला ग्रीलचा कठडा होता. या कठाड्याला  तात्पुरत्या स्वरुपात मच्छर जाळी लावण्यात आली होती. प्रियल खेळता खेळता बाल्कनीत गेली आणि त्या कठड्यावर चढली. याचदरम्यान कठाड्यावरून खाली डोकावून पाहत असताना मच्छरची जाळी तुटली आणि ती थेट खाली कोसळली. यातच प्रियलचा मृत्यू झाला.


आकस्मिक मृत्यूची नोंद

प्रियलच्या कुटुंबियांनी घराच्या बाल्कनीत मच्छर जाळी बसवण्याकरत इमरतीच्या बिल्डरकडे अनेकदा परवानगी मागितली होती. पंरतु, बिल्डरनं परवानगी न दिल्याने त्यांनी तात्पुरत्या स्वरुपाची जाळी बसवली. मात्र बिल्डरने याकडे दर्लक्ष केल्यामुळे ही घडना घडल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बिल्डरवर कोणत्याही प्रकराचा गुन्हा दाखल केला नसून प्रियलचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या