मृत्यूशी झुंज


  • मृत्यूशी झुंज
  • मृत्यूशी झुंज
SHARE

मुंबई - सैनिकी पेशा म्हटलं म्हणजे मृत्यूशी झुंज ही आलीच. मृत्यू कधी कोणत्या रूपात येईल याचा नेम नाही. पण हे शूर सैनिक अश्या मातीचे बनलेले असतात की मृत्यूवरही ते मात करतात. असच काहीस घडले आहे नेव्हीच्या दोन ड्रायव्हर्ससोबत. एका खलाश्याला वाचवण्याच्या नादात या दोघांनी समुद्रात उडी घेतली. खवळलेल्या समुद्राचा, रात्रीच्या मिट्ट काळोखाची कसलीच पर्वा त्यांना केली नाही. ज्या बोटीतून त्यांनी झेप घेतली होती तिच्याशीच त्यांचा संपर्क तुटला पण ते डगमगले नाहीत किंवा घाबरले नाहीत. तब्बल १२ तासांच्या अंतराळाने त्यांना वाचवण्यात आलं.

शनिवारी मुंबईपासून ३० नॉटिकल माईलवर १७ खलाशांसह दत्त साई नावाची मासेमारी नौका बुडाली. १४ जणांना वाचवण्यात आलं. पण तिघांचा पत्ता नव्हता. या तिघांना वाचवण्यासाठी नेव्ही कोस्ट गार्ड यांनी सामूहिक मोहीम उघडली. नेव्हीच्या आयएनएस त्रिशूळला एक खलाशी समुद्रात तरंगताना दिसला. तात्काळ बिपीन डहाल आणि गनश्याम पाटीधार यांनी समुद्रात उद्या घेतल्या. खलाशापर्यंत पोचण्याच्या नादात या दोघांचाही आयएनएस त्रिशूळशी संपर्क तुटला. मात्र तरीही या दोघांनी खलाश्याचा शोध सुरूच ठेवला. पण त्यांना शोधण्याचे आयएनएस त्रिशूळ चे सगळे प्रयत्न देखील फोल ठरले. तब्बल १२ तासांनन्तर राम दत्त साई नावाच्या मासेमारी बोटीने त्यांना वाचवले. फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ वेस्टर्न नेव्हल कमांडचे वाईस एडमिरल गिरीश लुथरा यांनी या दोघांची भेट घेतली. त्यांनी दाखवलेल्या पराक्रमाबद्दल गिरीश लुथरा यांनी त्यांचं अभिनंदन केलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या