अखेर 'त्या' सिरियल रेपिस्टला अटक

रेहान कुरेशीविरोधात नवी मुंबई, ठाणे, पालघर अशा १३ ठिकाणी बलात्काराच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणं नालासोपाऱ्यातील १५ पेक्षा अधिक तरूणींवर त्याने बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अखेर 'त्या' सिरियल रेपिस्टला अटक
SHARES

ठाणे, पालघर, नवी मुंबईतील १५ हून अधिक तरुणींवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी गुरूवारी अटक केली आहे. रेहान कुरेशी (३४) असं या सिरियल रेपिस्टचं नाव असून तो ९ ते १४ वर्षांच्या मुलींना धमकी देत त्यांच्यावर बलात्कार करायचा.

संशयित म्हणून ताब्यात

रेहान कुरेशीविरोधात नवी मुंबई, ठाणे, पालघर अशा १३ ठिकाणी बलात्काराच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणं नालासोपाऱ्यातील १५ पेक्षा अधिक तरूणींवर त्याने बलात्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रेहान कुरेशी हा खासगी कंपनीमध्ये सेल्समनचं काम करत होता. बुधवारी तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्यानंतर पोलिसांनी संशयित म्हणून त्याला ताब्यात घेतलं आणि गुरुवारी पोलिसांनी त्याला अटक केली.

लहान मुलींना टार्गेट 

रेहान कुरेशी हा लहान मुलींना टार्गेट करायचा. लहान मुलींच्या घरी कोण नसलं की संधी साधून हा घराचा दरवाजा ठोठवायचा. त्यानंतर मुलीने दरवाजा उघडला की तुझ्या वडिलांनी बोलावलं आहे असं सांगायचा. त्यानंतर मुलीला एखाद्या अनोळख्या ठिकाणी न्यायचा आणि जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार करायचा.  या सिरीयल रेपिस्टच्या विरोधात ११ तरुणींनी तक्रारी दाखल केल्या असून आणखी काही तरुणींनी भितीपोटी तक्रारी दाखल केलेल्या नाहीत. त्यामुळे त्याने केलेल्या बलात्कारांची संख्या मोठी असण्याची शक्यता अाहे.



हेही वाचा-

दुकानात मोबाइल चोरणाऱ्या इराणी महिलेला दोघांसहीत अटक

आशिष शेलार यांच्या भावाविरोधात विनयभंगाचा आरोप



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा