दुकानात मोबाइल चोरणाऱ्या इराणी महिलेला दोघांसहीत अटक

मोबाइल पुन्हा ठेवताना एक मोबाइल कमी असल्याचं दुकान मालक प्रकाश लोहार यांच्या लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी दुकानातील सीसीटिव्हीत पाहिले असता त्या परदेशी महिलेने मोबाइल चोरल्याचं दिसून आलं. मोबाइलच्या इएमआय नंबरवरून पोलिस तिघांचा माग काढत होते.

दुकानात मोबाइल चोरणाऱ्या इराणी महिलेला दोघांसहीत अटक
SHARES

परदेशी नागरिक असल्याची बतावणी करून खरेदीच्या नावाखाली दुकानात चोरी करणाऱ्या इराणी टोळीला नवघर पोलिसांनी जेरबंद केलं आहे.  तिघांना माहीम येथून अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अखिलेश कुमार यांनी दिली. त्यांनी चोरलेला मोबाइल पोलिसांनी हस्तगत केला आहे.  या तिघांनी अशा प्रकारे अन्य कुठल्या दुकानात चोरी केली आहे का याचा पोलिस तपास करत आहे.


मनी एक्सचेंजचा बहाणा 

मुलुंड पूर्वेला फडके रोडवर निल टेलीकाॅम हे मोबाइलचं दुकान आहे. सोमवारी दुपारी दुकानात एक महिला आणि दोन उच्चभ्रू नागरिक आले. आपण परदेशी नागरिक असल्याचे सांगत महिलेने  दुकान मालक प्रकाश लोहार यांना मनी एक्सचेंज करून देण्याची विनंती केली. यावेळी महिलेसोबतचा व्यक्ती दुकान मालकाशी बोलत असताना महिलेने दुकानातील कर्मचाऱ्यांना मोबाइल दाखवण्यास सांगत बोलण्यात गुंतवलं. तर तिसऱ्या महिलेने हातचलाखीने त्यातील एक मोबाइल बॅगेत टाकला. त्यानंतर काही क्षणात हे तिघेही दुकानातून निघून गेले.

चॅनेलवर बातमी बघून खबर

मोबाइल पुन्हा ठेवताना एक मोबाइल कमी असल्याचं दुकान मालक प्रकाश लोहार यांच्या लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी दुकानातील सीसीटिव्हीत पाहिले असता त्या परदेशी महिलेने मोबाइल चोरल्याचं दिसून आलं. मोबाइलच्या इएमआय नंबरवरून पोलिस तिघांचा माग काढत होते. त्यावेळी न्यूज चॅनेलवर या तिघांच्या चोरीच्या बातमीतील सीसीटीव्हीचे चित्रण बघून एका सुजाण नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून या तिघांना माहिम येथे पाहिल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिस चोरीला गेलेला मोबाइल ट्रेस करून तिघांपर्यंत पोहचले. हे तिघेही इराण या देशाचे रहिवाशी असून त्यांच्यावर इतर कुठल्या गुन्ह्यांची नोंद आहे का, याचा पोलिस तपास करत आहेत.



हेही वाचा -

आशिष शेलार यांच्या भावाविरोधात विनयभंगाचा आरोप

अंगावरून कार जाऊनही चिमुरडा वाचला!





Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा