समुद्रात सापडला तरुणीचा मृतदेह

 Pali Hill
समुद्रात सापडला तरुणीचा मृतदेह

मुंबई - नाैदलाच्या आयएनएचएस अश्विनी हाॅस्पिटलपासून समुद्रात दोन ते तीन किलोमीटर अंतरावर बुधवारी रात्री नौदलाच्या गस्त नाैकेतल्या अधिकाऱ्यांना एका तरूणीचा चादरीत गुंडाळलेला मृतदेह सापडला. त्यांनी तत्काळ याची माहिती यलोगेट पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहचलेल्या यलोगेट आणि कफ परेड पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. या तरूणीची अद्याप ओळख पटली नसून कफ परेड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. त्याच चादरीत पोलिसांना एका मुलीचे फोटो देखील सापडले असून, एक फोटो फाटलेल्या अवस्थेत होता. हे फोटो या तरुणीचे असू शकतात किंवा लक्ष भरकटवण्यासाठी देखील आरोपीनं हा खेळ रचल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. या मुलीची उंची पाच फुट असून, तिनं लाल टी-शर्ट आणि काळ्या रंगाची थ्री फोर्थ घातली होती. तिच्या टी- शर्टवर कूपर असं लिहलं असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. तसंच तरूणीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.

Loading Comments