केकच्या नावाखाली ड्रग्ज विकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अटक

एनसीबीने १२ जूनला 'मारिजुआना' या अमली पदार्थांचा वापर करुन केक तयार करणाऱ्यावर बेकरीवर छापा टाकून एका महिलेसह दोन जणांना अटक केली होती.

केकच्या नावाखाली ड्रग्ज विकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अटक
SHARES

 केक (cakes) आणि पेस्ट्रीज (pastries) मधून ड्रग्सची विक्री केली जात असलेल्या मालाडच्या एका बेकरीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी - ncb) मागील आठवड्यात छापा टाकला होता. त्यावेळी तीन तस्करांना अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात आता आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.  अटक करण्यात आलेला  महाविद्यालयीन विद्यार्थी असून त्याच्याकडं एलएसडी नावाचं ड्रग्ज आढळलं आहे. 

एनसीबीने १२ जूनला 'मारिजुआना' या अमली पदार्थांचा वापर करुन केक तयार करणाऱ्यावर बेकरीवर छापा टाकून एका महिलेसह दोन जणांना अटक केली होती.  याच बेकरीशी संबंधित सचिन तुपे नावाच्या तरुणाला एनसीबीने रविवारी मरोळ परिसरातून अटक केली. त्याच्याकडे एलएसडी या अमली पदार्थांचे ११ तुकडे सापडले आहे.  या प्रकरणी एनसीबीकडून आणखी तपास सुरू आहे.

मालाडमधील या बेकरीतून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी १६० ग्रॅम गांजा जप्त केला होता. केकमध्ये ड्रग्ज भरून हायप्रोफाईल परिसरात विक्री केली जात असल्याचं उघडकीस आलं होतं.

दरम्यान,  एनसीबीने रविवारी अन्य दोन महत्त्वाच्या कारवाया केल्या. गोरेगाव पश्चिम येथून अफसर खान नावाच्या एका रिक्षाचालकाला अटक केली. त्याच्याकडे २० ग्रॅम कोकेनचा साठा सापडला. अफसर हा मिरा रोड परिसरातील एका आफ्रिकी नागरिकाला कोकेन देण्यासाठी जात होता. हा आफ्रिकी नागरिक दररोज सकाळी उच्चभ्रू ग्राहकांकडून कोकेनची मागणी नोंदवून त्यानुसार पुरवठा करतो. दुसऱ्या एका कारवाईत माहीममधून ६० ग्रॅम मोफेड्रेन व ३६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली.



हेही वाचा -

३० ते ४४ वयोगटाचं मोफत लसीकरण

बनावट ओळखपत्रावर लोकल प्रवास करत असाल तर सावधान!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा