हळदी कार्यक्रमातूनच ड्रग्ज पॅडलरला उचललं, एनसीबीची कारवाई

एनसीबीने याआधी कुख्यात न्यूटोरिअस ड्रग्ज ट्रॅफिकर बबलू पटरीला अटक केली होती. त्याच्याकडून हिमाचल प्रदेशच्या फॅक्टरीत तयार केलेले २० किलो कोडीन सिरप, ५६ ग्रॅम एमडी आणि ४५० ग्रॅम गांजा जप्त केला होता.

हळदी कार्यक्रमातूनच ड्रग्ज पॅडलरला उचललं, एनसीबीची कारवाई
SHARES

मुंबई सुशांतसिंह राजपूत आत्महत्येनंतर ड्रग्ज तस्कर, पॅडलरांवर कारवाईची धडक मोहीम नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) राबवली आहे. बुधवारी रात्री एनसीबीने एका ड्रग्ज पॅडलरला त्याच्या हळदी कार्यक्रमातूनच अटक केली. इब्राहिम शेख असं या आरोपीचे नाव ड्रग्ज पॅडलरचं नाव आहे. गुरूवारी न्यायालयात हजर केले असता त्याला १५ फेब्रुवारीपर्यंत एनसीबी कोठडी मिळाली आहे.

इब्राहिमचे गाेवंडीत लग्न होणार असल्याची माहिती एनसीबीला खबऱ्यांकडून मिळाली. गोवंडीत हळदीचा कार्यक्रम सुरू असताना या कार्यक्रमात घुसून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी इब्राहिमला ताब्यात घेतले. मेंहदी, हळद लावलेल्या इब्राहिमला एनसीबीच्या टीम झोन हेड क्वार्टरवर चौकशीसाठी ठेवण्यात आलं आहे. एनसीबीची कुर्ला आणि गोवंडी परिसरात धाडसत्र सुरू आहेत.

एनसीबीने याआधी कुख्यात न्यूटोरिअस ड्रग्ज ट्रॅफिकर बबलू पटरीला अटक केली होती. त्याच्याकडून हिमाचल प्रदेशच्या फॅक्टरीत तयार केलेले २० किलो कोडीन सिरप, ५६ ग्रॅम एमडी आणि ४५० ग्रॅम गांजा जप्त केला होता. या ड्रग्जची मुंबईत डिलिव्हरी होणार होती. त्यापूर्वीच एनसीबीने त्याला अटक केली. त्यानंतर एनसीबीने ड्रग्ज प्रकरणाचे पाळेमुळे शोधण्यास सुरूवात केली. पटरीला अटक केल्यानंतर सर्व ड्रग्ज पॅडलर अंडरग्राऊंड झाले हाेते.



हेही वाचा -

कोविड चाचणी होणार आता ४९९ रुपयांत

मुंबईतील कॉलेज सुरू होण्याबाबत संभ्रम



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा