ड्रग्स प्रकरण : अनन्या पांडे संदर्भात NCBचा मोठा खुलासा, व्हॉट्सअ‍ॅप चॅट...

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास आता अभिनेत्री अनन्या पांडेपर्यंत पोहोचला आहे.

ड्रग्स प्रकरण : अनन्या पांडे संदर्भात NCBचा मोठा खुलासा, व्हॉट्सअ‍ॅप चॅट...
SHARES

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास आता अभिनेत्री अनन्या पांडेपर्यंत पोहोचला आहे. गुरुवारी झालेल्या चौकशीनंतर अनन्याला शुक्रवारी सकाळी ११ वाजता पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पण ती दुपारी अडीच वाजताच्या सुमारास एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली.

आर्यनचे काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. त्यात त्यानं अनन्यासोबत अमली पदार्थाबद्दल चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

चॅटमध्ये आर्यन खान अभिनेत्री अनन्या पांडेला म्हणतो की, 'गांजा मिळू शकतो का?' त्यावर अनन्या पांडे म्हणते, 'मी व्यवस्था करते.' एनसीबीनं आढळून आलेल्या चॅटची चौकशी सुरू केली असून, यासंदर्भात गुरुवारी अनन्या पांडेला समन्स बजावण्यात आला होता.

काल झालेल्या चौकशीदरम्यान एनसीबीनं अनन्याला हे चॅट दाखवले आणि प्रश्न विचारला ज्याला अनन्यानं उत्तर दिलं की, मी फक्त विनोद करत होते.

अनन्याला एनसीबीनं चॅटवर सतत प्रश्न विचारले असले, तरी तिचे उत्तर असे होते की, आर्यनशी तिचे जे काही संभाषण होते ते सिगारेटबद्दल होते. आम्ही ड्रग्जबद्दल बोललो नाही. अनन्याला विचारले की, तिने कधी ड्रग्ज घेतलं आहे का, तेव्हा अभिनेत्रीनं स्पष्टपणे नकार दिला.

गुरुवारी अनन्याची सुमारे अडीच तास चौकशी केल्यानंतर एनसीबीनं तिला शुक्रवारी पुन्हा समन्स बजावले होते. अनन्या गुरुवारी संध्याकाळी ४ वाजता एनसीबी कार्यालयात पोहोचली होती.

नियोजित वेळेनुसार ती दोन तास उशिरा चौकशीसाठी हजर झाली होती. यावेळी तिचे वडील आणि अभिनेते चंकी पांडे आणि वकील सोबत होते. संध्याकाळी ६.१५ च्या सुमारास ती एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली होती.हेही वाचा

आर्यन खानच्या कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ

ड्रग्स प्रकरण : शाहरुखच्या मन्नतसोबतच 'या' अभिनेत्रीच्या घरात NCBचा छापा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा