ड्रग्स प्रकरण : शाहरुखच्या मन्नतसोबतच 'या' अभिनेत्रीच्या घरात NCBचा छापा

आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये तो एका अभिनेत्रीशी ड्रग्सवर चर्चा करत होता असा खुलासा केला होता. आता या अभिनेत्रीच्या घरी छापा टाकल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

ड्रग्स प्रकरण : शाहरुखच्या मन्नतसोबतच 'या' अभिनेत्रीच्या घरात NCBचा छापा
SHARES

चंकि पांडेची मुलगी अनन्या पांडेच्या घरी NCBनं रेड टाकली आहे. यासोबतच शाहरुखच्या मनंत बंगलोवर देखील NCBची रेड पडली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता अनन्या पांडेचं नाव देखील समोर येत आहे. 

NCB च्या टीमनं गुरुवारी मुंबईतील अंधेरी भागात छापे टाकले. मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात एका आरोला देखील अटक करण्यात आली आहे.

एनसीबीची एक टीम अनन्या पांडे आणि चंकी पांडे यांच्या खार पश्चिम, मुंबई इथल्या निवासस्थानी पोहोचली आहे. अनन्या पांडेला एनसीबीनं आज दुपारी २ वाजता बोलावलं आहे.

आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये तो एका अभिनेत्रीशी ड्रग्सवर चर्चा करत होता असा खुलासा केला होता. आता अनन्याच्या घरी छापा टाकल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. 

गुरुवारी आर्थर रोड जेलमध्ये मुलगा आर्यन खानला भेटल्यानंतर शाहरुख खानच्या 'मन्नत' निवासस्थानी NCB ची टीम पोहोचली. मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात अटक झालेल्यांमध्ये आर्यन खानचा समावेश आहे.

बुधवारी मुंबईच्या विशेष न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. आर्यन खान आणि इतर ८ जणांना ३ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आलं होतं. नंतर एनसीबीनं मुंबई किनाऱ्यावरील कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर त्यांना अटक केली.

दरम्यान, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता त्याच्या सुनावणीवर पुढच्या आठवड्यात म्हणजेच मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुढचे ६ दिवस त्याचा मुक्काम तुरुंगातच असेल.

क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात गेला होता. आज आर्यन खानच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होणार होती. पण आता ही सुनावणी पुढे ठकलण्यात आली आहे.हेही वाचा

आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

ड्रग्स प्रकरण : आर्यनशी व्हॉट्सअॅपवर चॅट करणारी अभिनेत्री कोण?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा